देशातील ४० वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द; आणखी १५० रडारवर, महाराष्ट्रात कोणती?  

आयोगाच्या अंडरग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्डने (UGMEB) केलेल्या पाहणीमध्ये अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.

देशातील ४० वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द; आणखी १५० रडारवर, महाराष्ट्रात कोणती?  
National Medical Commission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील दीड-दोन महिन्यांच्या कालावधी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) देशभरातील जवळपास ४० वैद्यकीय महाविद्यालयांची (Medical Colleges) मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आणखी १५० महाविद्यालयांची मान्यता रद्द केली जाऊ शकते. आयोगाच्या नियमावलीचे पालन न केल्याने या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेश (Admission In Medical College) थांबविण्यात आले आहे. दरम्यान, या महाविद्यालयांमध्ये गुजरात (Gujarat), आसाम (Assam), पुदुच्चेरी, तमिळनाडू (Tamil Nadu), आंध्र पद्रेश (Andhra Pradesh), त्रिपुरा (Tripura) आणि पश्चिम बंगालमधील (West Bengal) महाविद्यालयांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आयोगाच्या अंडरग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्डने (UGMEB) केलेल्या पाहणीमध्ये अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आधारवर आधारित बायोमेट्रिक हजेरी, महाविद्यालयांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे नसणे किंवा ते सुस्थितीत नसणे, प्राध्यापकांची पदे रिक्त आधी मुद्द्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता इतर महाविद्यालयांचेही धाबे दणाणले आहे.

मोठी बातमी : दहावीचा निकाल २ जून रोजी; राज्य मंडळाने केली अधिकृत घोषणा

या ४० महाविद्यालयांनंतर आता आणखी १५० महाविद्यालये आयोगाच्या रडारवर आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील महाविद्यालयांचा समावेश आहे किंवा नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र गुजरातसह आसाम, पद्दुचेरी, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील सर्वाधिक महाविद्यालये आहेत. यामध्ये काही शासकीय महाविद्यालयांचा तसेच काही प्रतिष्ठित महाविद्यालयांचाही समावेश आहे.

 UGMEB च्या अध्यक्षांनी महाविद्यालयांच्या अधिष्ठातांना पत्र पाठवून त्रुटींबाबत माहिती देत मान्यता रद्द केली जात असल्याचे म्हटले आहे. संबंधित महाविद्यालयांना आपली बाजू मांडण्याची संधीही दिली जाणार आहे. त्यानंतर १५० महाविद्यालयांची मान्यताही रद्द केली जाईल, असे समजते.

नक्षलवाद्यांसोबत राहून बंदुकीशी खेळणाऱ्या राजुलाचा बारावीच्या परीक्षेत यशस्वी लक्ष्यभेद

दरम्यान, मागील काही वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयांचा आकडा वेगाने वाढला आहे. २०१४ मध्ये हा आकडा ३८७ एवढा होता. आता त्यामध्ये तब्बल ६९ टक्क्यांनी वाढून होऊन ६५४ वर पोहचला आहे. तर एमबीबीएसच्या जागांमध्ये ९४ टक्के वाढ झाली आहे, २०१४ मध्ये एमबीबीएसच्या जागा जवळपास ५१ हजार होत्या. या जागा आता दुप्पट झाल्या आहेत. पदव्युत्तर पदवीच्या जागांमध्ये तब्बल १०७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2