राज्यातील मेडिकल प्रवेशाची संख्या वाढवली; निवासी डॉक्टरांच्या मानधनतही वाढ

जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक, जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गडचिरोली, सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि अंबरनाथ जिल्हा ठाणे या ठिकाणी नवीन मेडिकल कॉलेज सुरू करण्यास मान्यता.

राज्यातील मेडिकल प्रवेशाची संख्या वाढवली; निवासी डॉक्टरांच्या मानधनतही वाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मेडिकल प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेवरून देशातील वातावरण तापलेले आहे. मात्र,मेडिकल अभ्यासक्रमास प्रवेश (Admission to medical courses)घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar)यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्यात विविध ठिकाणी मेडिकल कॉलेज व 430 खाटांचे संलग्न रुग्णालय (Medical College and 430 bed affiliated hospital)सुरू करण्याची घोषणा केली आहे.त्यामुळे राज्यातील मेडिकल प्रवेशाच्या जागांमध्ये (Medical Admission Seats)पुढील काळात वाढ होणार आहे.

अर्थ संकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले,राज्यात सध्या एक लाख लोकसंख्येमागे 84 डॉक्टर आहेत. परंतु, 2035 पर्यंत आपल्याला एक लाख लोकसंख्येमागे शंभराहून अधिक डॉक्टर करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करायचे आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता वाढवणे आवश्यक आहे.त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतीची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच 430 खाटांचे सलग्न रुग्णालय स्थापन करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. त्यात जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक, जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गडचिरोली, सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि अंबरनाथ जिल्हा ठाणे यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

सावर तालुका म्हसळा जिल्हा रायगड येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे.त्याचाप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर यांच्या विद्या वेतनात तसेच मानसेविक अध्यापकांच्या मानधनात देखील भरीव वाढ करण्यात आली आहे.