कारागृह लिपिक भरती: कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर 

वेळापत्रकानुसार ८ जुलै ते ११ जुलै या कालावधीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. 

कारागृह लिपिक भरती:  कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कारागृह विभाग सरळसेवा लिपिक, वरिष्ठ लिपिक पदभरती २०२३-२४ (Clerk, Senior Clerk Recruitment 2023-24) अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेत पात्र असलेल्या उमेदवारांसाठी  कागदपत्र पडताळणी,(Document verification schedule) वैद्यकिय तपासणी व पूर्वचारित्र्य पडताळणी यासाठीचे वेळापत्रक प्रसिद्ध (Schedule released) करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार ८ जुलै ते ११ जुलै या कालावधीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. 

कारागृह विभाग सरळसेवा लिपिक, वरिष्ठ लिपिक पदभरती २०२३-२४ अंतर्गत लिपिक १२५ पदे व वरिष्ठ लिपिक पदांच्या ३१ रिक्त जागांसाठी भरती कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानंतर १९ मार्च ते २१ मार्च २०२४ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडसूची कारागृह विभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahaprisons.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडसूचीत नाव असलेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात येत आहे. 

कारागृह विभागाने लिपिक व वरिष्ठ लिपिक संवर्गातील निवडयादीत नमुद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले कागदपत्र  जसे की, शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, समांतर आरक्षण संबंधी पूरावा व इतर सर्व मुळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतीसह उमेदवाराला दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत समक्ष उपस्थित राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.