CLAT 2025 परीक्षेचे अर्ज 7 जुलैपासून; लॉ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट 

CLAT 2025 परीक्षेचे अर्ज 7 जुलैपासून; लॉ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विधी अभ्यासक्रमास (study of law) प्रवेश घेण्याची इच्छा असणार्‍या उमेदवारांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. कायदा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी भारतातील सर्वात मोठ्या लॉ अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची नोटीस प्रसिद्ध झाली आहे. CLAT 2025 अधिसूचना आणि CLAT परीक्षेचा अर्ज येत्या 7 जुलै रोजी CNLU आणि CLAT च्या अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर प्रसिद्ध केला जाईल.

कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजने (NLU  कन्सोर्टियम) नुकतेचे स्पष्ट केले आहे.  CLAT 2025 ची जाहिरात येत्या 7 जुलै 2024 रोजी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही माध्यमातून प्रसिद्ध केली जाईल. 

CLAT परीक्षा अर्ज शुल्क जनरल/ ओबीसी/पीडब्ल्यूडी/एनआरआय/पीआयओ/ओसीआयसाठी 4 हजार रुपये आणि प्रश्नपत्रिकांसह  4,500 रुपये असेल. तर SC/ST/BPL साठी 3500 रुपये आणि प्रश्नपत्रिकांसह 4000 रुपये इतके असेल. 

CLAT अर्जाची  लिंक 7 जुलै रोजी सक्रिय झाल्यानंतर, उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्डच्या मदतीने साइन इन करावे लागेल आणि तपशीलवार अर्ज भरावा लागेल. शेवटी फी जमा करावी लागेल. ही परीक्षा 2 तासांच्या कालावधीसाठी ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल.परीक्षेतील पाच विभागांमधून प्रश्न विचारले जातील.  इंग्रजी भाषा (22-26 प्रश्न), चालू घडामोडी यासह सामान्य ज्ञान (28-32 प्रश्न), कायदेशीर तर्क (28-32 प्रश्न), लॉजिकल रिझनिंग (22-26 प्रश्न), आणि संख्यात्मक क्षमता (10-14 प्रश्न) CLAT अभ्यासक्रम 2025 मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक विभागात एकूण पेपरची विशिष्ट टक्केवारी असेल.