IT क्षेत्रातील 'या' कंपनीत 6 हजार पदांची भरती, फ्रेशर्स उमेदवारांना मोठी संधी.. 

टेक महिंद्रामध्ये ६ हजार नवीन फ्रेशर्सची भरती केली जाणार असल्याची माहिती कंपनीचे व्यसस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित जोशी यांनी दिली आहे. 

IT क्षेत्रातील 'या' कंपनीत 6 हजार पदांची  भरती, फ्रेशर्स उमेदवारांना मोठी संधी.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आयटी क्षेत्रात एसीमध्ये बसून काम करणाऱ्यांसाठी टेक महिंद्रा कंपनीत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. (Tech Mahindra Company) टेक महिंद्रामध्ये ६ हजार नवीन फ्रेशर्सची भरती (Recruitment of 6 thousand new freshers) केली जाणार असल्याची माहिती कंपनीचे व्यसस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित जोशी (Chief Executive Officer Mohit Joshi) यांनी दिली आहे. 

आयटीमध्ये नोकरी करणाऱ्यासांठी ही मोठी संधी उपलब्ध असणार आहे. आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी टेक महिंद्रा मध्ये फ्रेशर्स उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. चालू २०२३-२४ या आर्थिक वर्षात ही सर्व ६ हजार नवीन फ्रेशर्स कामगारांची पदे भरली जाणार आहेत, अशी माहिती टेक महिंद्राच्या पुणे मुख्यालयाने दिली आहे. 

टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित जोशी म्हणाले, दर तीन महिन्याला 1,500 पेक्षा जास्त नवीन उमेदवारांना सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच या वर्षभरात आम्ही 50 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण देणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली आहे. मोहित जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेक महिंद्रा आपल्या कामगिरीत सुधारणा करत आहे. कामगारांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची  माहिती जोशी यांनी दिली आहे.