धक्कादायक: 25 हजार शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द; शिक्षकांकडून व्याजासह वेतन वसूल करण्याचे न्यायालयाचे आदेश
शिक्षकांकडून व्याजासह वेतन वसूल करण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षकाची नोकरी मिळावी म्हणून लाच दिलेल्या तब्बल 25 हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात (The jobs of 25 thousand teachers are at risk)आल्या आहेत. 2016 मध्ये पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती (Teacher Recruitment in West Bengal)प्रकरणी उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आदेश (An important order by the High Court)दिला आहे, ज्यामध्ये या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात आणि त्या ठिकाणी नियुक्त झालेल्या शिक्षकांकडून व्याजासह वेतन वसूल (Collection of salary with interest from teachers)करण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे. त्यासाठी न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.
हेही वाचा : धक्कादायक : शिक्षण खात्यातून लाखो रुपये चोरीला, सरकार मात्र प्रचारांच्या फेरीला..
उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर 25 हजारांहून अधिक सरकारी शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. 2016 मध्ये पश्चिम बंगाल सरकारनेसुमारे 2 हजार 750 पदांवर शिक्षकांची भरती जाहीर केली होती. शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा खेळ झाल्याचा आरोप केला जात आहे. या भरतीसाठी 5 ते 15 लाख रुपयांपर्यंतची लाच घेण्यात आली होती. त्यानंतर त्याला शिक्षक भरती घोटाळा असे नाव देण्यात आले. या प्रकरणी पश्चिम बंगाल हायकोर्टात रिट दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने या सर्व नोकऱ्या रद्द करण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या या आदेशाचा परिणाम 25 हजार 750 शिक्षकांच्या नोकऱ्यांवर होणार आहे.
न्यायमूर्ती देबांशू बसाक आणि न्यायमूर्ती मोहम्मद सब्बीर रशीद यांच्या खंडपीठाने या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करताना सांगितले की, "जे लोक दीर्घकाळापासून बेकायदेशीरपणे काम करत आहेत.त्यांना त्यांचे वेतन व्याजासह परत करावे लागेल."