NMMSS राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी नवे पोर्टल सुरू

पात्र उमेदवार Scholarship.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

NMMSS राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी नवे पोर्टल सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इयत्ता ९ वी ते १२ वीच्या गुणवंत शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते.  नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप स्कीम (NMMSS) उपक्रमात हा शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) सुरु केले आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 असणार आहे.  

नोंदणी पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना आधार क्रमांकानुसार जारी केलेला 14 अंकी क्रमांक प्रदान केला जाईल जो संपूर्ण शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी वैध असणार आहे. इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर (INO) द्वारे लेव्हल-1 पडताळणी आणि जिल्हा नोडल ऑफिसर (DNO) द्वारे लेव्हल-2 पडताळणी यांचा समावेश होतो. INO (L1) पडताळणीची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे आणि DNO (L2) पडताळणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 असणार आहे.

विद्यार्थ्यांनी त्यासाठी इयत्ता 8 वी मध्ये असणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी मागील वर्षाच्या परीक्षेत किमान 55% गुण (SC/ST विद्यार्थ्यांसाठी 50%) प्राप्त केलेले असावे. ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी (नवीनतम आयकर रिटर्न किंवा सक्षम प्राधिकाऱ्याच्या प्रमाणपत्रानुसार) या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना 12,000 रुपये वार्षिक शिष्यवृत्ती तिमाही हप्त्यांमध्ये मिळणार आहे. 

NMMSS 2024 साठी कसा अर्ज कराल?  

सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना Scholarship.gov.in या अधिकृत साइटवर जावे. नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक तपशील प्रविष्ट करा. नोंदणी पूर्ण झाल्यावर, अर्ज भरावा व आवश्यक असल्यास कागदपत्रे अपलोड करा त्यांनतर सबमिटवर क्लिक करा आणि पृष्ठ डाउनलोड करावा.पुढील आवश्यकतेसाठी अर्जाची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.