WCD जलसंधारण विभाग भरती पुर्नपरीक्षाचे प्रवेशपत्र जाहीर 

14 ते 16 जुलै या कालावधीत पुर्नपरीक्षेचे नियोजित करण्यात आले आहे. पुनर्परीक्षा राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या 7 शहरांमधील 10 TCS-ION च्या अधिकृत केंद्रांवर घेतली जाईल.

WCD जलसंधारण विभाग भरती पुर्नपरीक्षाचे प्रवेशपत्र जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

महाराष्ट्र जलसंधारण विभागाने (WCD) जलसंधारण अधिकारी गट-ब भरती पुनर्परीक्षा 2024 (Water Conservation Officer Group-B Recruitment Re-examination 2024) साठी प्रवेशपत्रे प्रसिद्ध (Admit cards released) केली आहेत. जलसंधारण विभागाअंतर्गत 670 पदांसाठी 14 ते 16 जुलै या कालावधीत पुर्नपरीक्षेचे नियोजित करण्यात आले आहे. पुनर्परीक्षा राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या 7 शहरांमधील 10 TCS-ION च्या अधिकृत केंद्रांवर घेतली जाईल.

अमरावतीच्या ड्रीमलँड परीक्षा केंद्रावर 20 आणि 21 फेब्रुवारीला विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याच्या घटनेने एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्याकडूनच हा पेपर फोडला गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात आलेली 670 पदाची  भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. 

विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी लावून धरली होती. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, तसेच परीक्षेबाबत विश्वासहर्ता कायम राहावी या उद्देशाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबत राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी संबंधित विभागाला आदेश दिले. त्यानंतर आता पुर्नपरीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेला राज्यात 52 हजार 690 विद्यार्थी बसले होते. 

हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे

उमेदवाराने प्रथम WCD चे अधिकृत संकेतस्थळ swcd.maharashtra.gov.in ला भेट द्यावी. मुख्यपृष्ठावर, जलसंधारण अधिकारी (बांधकाम), गट-ब (अराजपत्रित) भरतीसाठी अर्जाची लिंक या लिंकवर क्लिक करावे. दिसणाऱ्या नवीन पृष्ठावरील लॉगिन टॅबवर क्लिक करा. लॉगिन पृष्ठावर तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करा. प्रतिमेमध्ये दर्शविलेले वर्ण टाइप करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. तुमचे WCD महाराष्ट्र हॉल तिकीट 2024 स्क्रीनवर दिसेल. परीक्षेसाठी आणि भविष्यातील संदर्भासाठी हॉल तिकीट डाउनलोड आणि प्रिंट करा.