स्कूल बसचा भीषण अपघात, ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, १५ जण जखमी
ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा भयंकर प्रकार घडला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
हरियाणा येथील महेंद्रगड (Mahendragarh School Bus Accident) येथे आज सकाळच्या सुमारास एका स्कूल बसचा भीषण अपघात (School bus accident) झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये ६ शाळकरी मुलांचा मृत्यू (Death of 6 school children) झाला असून १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ओव्हरटेक करण्याच्या नादात बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा भयंकर अपघात घडला आहे. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
महेंद्रगडच्या कनिना शहरात असलेल्या जीएल पब्लिक स्कूलची बस गुरुवारी सकाळी मुलांना घेऊन शाळेत जात होती. उन्हणी गावाजवळ ओव्हरटेक करताना स्कूल बस अचानक उलटली. यावेळी जोरदार स्फोट आणि आरडाओरडा झाला. आजूबाजूच्या लोकांनी मदत करण्यासाठी धाव घेत शासन स्तरावर मदतीची मागणी केली.
काही प्रत्यक्षदर्शी नागरीकांनी सांगितले की, अपघात झालेल्या स्कूल बसचा चालक दारूच्या नशेत गाडी चालवत होता. बस सुसाट वेगाने जात होती काही अंतरावर गेल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस झाडावर आदळली. यामुळे मोठा अपघात झाला असून अनेक मुले गंभीर जखमी झाली आहेत.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण 20-25 मुले होती. जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू असून, चालक झोपला होता की नशेत होता, याचा तपास करण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://www.instagram.com/reel/C5nK5Q5OO6j/