विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा जून महिन्यापासून

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील उन्हाळी सत्रात पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन आहे. अभ्यासक्रमानुसार त्या त्या विषयांची वेळापत्रक विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहेत.

विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा जून महिन्यापासून
Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क/पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (sppu)चालू शैक्षणिक वर्षाच्या (२०२२-२३) अंतिम सत्राच्या परीक्षा (last semester exam)जून महिन्यापासून सुरू करण्याचे नियोजन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून (University exam department ) करण्यात आले आहे. 

       परीक्षा विभागातर्फे या विषयीची मार्गदर्शक तत्वे आणि सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील उन्हाळी सत्रात पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन आहे. अभ्यासक्रमानुसार त्या त्या विषयांची वेळापत्रक विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे नियोजन हे महाविद्यालय स्तरावर तर अन्य नियोजन हे विद्यापीठ स्तरावर केले जाणार असल्याचे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज वेळेत भरावेत, असेही आवाहन विद्यापीठ परीक्षा मंडळाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा या २ ते ३० मे या कालावधीत होतील तर जून महिन्यापासून लेखी परीक्षेला सुरुवात होईल. 

-----------

"नवीन शैक्षणिक वर्ष ऑगस्टमध्ये सुरू करण्याचे नियोजन असून चालू शैक्षणिक वर्षाच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रातील परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयांनी नियोजित कालावधीमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून परीक्षा वेळेत पार पडण्यास मदत होईल."

- डॉ.महेश काकडे, संचालक ,परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ