FTII च्या विद्यार्थ्यांचा 77 व्या कान चित्रपट महोत्सवात डंका

एफटीआयआयच्या एका वर्षाच्या दूरचित्रवाणी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा चित्रपट कान चित्रपट महोत्सवात निवडला जाण्याची आणि पुरस्कार मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

FTII च्या विद्यार्थ्यांचा 77 व्या कान चित्रपट महोत्सवात डंका

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय- FTII)च्या चिदानंद नाईक (Chidanand Naik)या विद्यार्थ्यांच्या (student) “सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो”, (Sunflowers were the first ones to know) या चित्रपटाला फ्रान्समधील 77 व्या कान चित्रपट महोत्सवात (77th Cannes Film Festival in France)सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी कानचा ‘ला सिनेफ’ पुरस्कार (La Cinef Award)मिळाला आहे.पुरस्कारांची अधिकृत घोषणा 23 मे 2024 रोजी झालेल्या महोत्सवात करण्यात आली.एफटीआयआयच्या एका वर्षाच्या दूरचित्रवाणी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा चित्रपट कान चित्रपट महोत्सवात निवडला जाण्याची आणि पुरस्कार मिळवण्याची ही पहिलीच वेळ (First time to receive an award)आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असून भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळत आहे. विशेषत:  एफटीआयआय ने कानमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून गेल्या काही वर्षांमध्ये या महोत्सवात या संस्थेच्या विद्यार्थ्यांचे चित्रपट दाखवले जात आहेत.  73 व्या कान चित्रपट महोत्सवामध्ये ‘कॅटडॉग’ या एफटीआयआय च्या विद्यार्थ्याच्या चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर चार वर्षांनी नाईक यांच्या चित्रपटाला हा सन्मान मिळाला आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन चिदानंद एस नाईक यांनी ,चित्रपटाचे छायाचित्रण सूरज ठाकूर यांनी तर संकलन मनोज व्ही यांनी केले आहे तसेच अभिषेक कदम यांनी ध्वनीमुद्रण केले. 77 व्या कान चित्रपट महोत्सवात भारतातून विविध श्रेणींमध्ये अनेक प्रवेशिका पाठवण्यात आल्या होत्या. पायल कपाडिया, मैसम अली, संतोष सिवन, चिदानंद एस नाईक या  एफटीआयआय च्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी या वर्षाच्या कान  चित्रपट महोत्सवामध्ये चमक दाखवली.

“सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो”, ही एका वृद्ध स्त्रीची कथा आहे जी गावातील कोंबडा चोरते आणि त्यामुळे स्थानिक समाजात  गोंधळ उडतो.  तो कोंबडा परत मिळवण्यासाठी, वृद्ध महिलेच्या कुटुंबाला वनवासात पाठवण्याची घोषणा केली जाते.

फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आर. माधवन यांनी चित्रपटाच्या संपूर्ण विद्यार्थी चमूचे अभिनंदन केले आहे.तसेच विलक्षण ओळख आणि प्रेम यासह झळाळत्या करिअरचा  हा शुभारंभ रहावा. अशा जागतिक दर्जाच्या प्रतिभेला सामोरे आणल्याबद्दल मी एफटीआयआय चे सर्व कर्मचारी आणि प्रशासन यांचे अभिनंदन  करतो,असेही राघवन यांनी सांगितले.

जगभरातील 555 फिल्म स्कूलनी सादर केलेल्या एकूण 2,263 चित्रपटांमधून निवडलेल्या 18 लघुपटांमध्ये (14 ॲक्शन आणि 4 ॲनिमेटेड चित्रपट) निवड झालेला हा चित्रपट होता.
----------------------------------------------------------