नक्षलवाद्यांसोबत राहून बंदुकीशी खेळणाऱ्या राजुलाचा बारावीच्या परीक्षेत यशस्वी लक्ष्यभेद

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या १२ वी च्या परीक्षेत राजूलाने ४५ टक्के गुण मिळवत नव्या आयुष्याची सुरूवात केली आहे.

नक्षलवाद्यांसोबत राहून बंदुकीशी खेळणाऱ्या राजुलाचा बारावीच्या परीक्षेत यशस्वी लक्ष्यभेद
Rajula Hidami

दीपा पिल्ले पुष्पकांथन

अवघ्या १२ वर्षांची असताना तिच्या मनाविरुद्ध तिला नक्षलवादी (Naxalite) बनावे लागले, कशीबशी त्यांच्याकडून सुटका करून घेत तिने गोंदिया पोलिसांसमोर (Gondia Police) आत्मसमर्पण केले. तिची पुढे शिकायची इच्छा लक्षात घेत पोलीस अधिकाऱ्यांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. यावर्षी तिने बारावीच्या (HSC Result) परीक्षेत यश मिळवत पोलिसांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. ही गोष्ट आहे एके काळी नक्षलवादी असलेल्या राजुला हिडामी (Rajula Hidami) हिची.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (HSC Board) घेतलेल्या १२ वी च्या परीक्षेत राजुलाने ४५ टक्के गुण मिळवत नव्या आयुष्याची सुरूवात केली आहे.  तिच्या या यशाबद्दल 'एज्युवार्ता'शी बोलताना राजुला म्हणाली, मी मुळची कुरखेडा तालुक्यातील लव्हारी या गावची राहणारी आहे. आमच्या गावात ७ वी पर्यंतच शाळा होती. त्यामुळे माझे शिक्षण ७ वी पर्यंतच झाले होते. मी १२ वर्षांची असताना शेळ्या चारायला जंगलात जायचे. शेळ्या नेत असताना १०-१२ जण माझ्याकडे आले त्यांनी मला एका ठिकाणाचा पत्ता विचारला. मी त्यांना पत्ता सांगितला पण तो त्यांना नीट समजला नाही.

Engineering Diploma admission : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया १ जून पासून सुरु

राजुलाने या लोकांना तिच्याच गावात यापुर्वीही पाहिले होते. ते लोक गावात बैठका घ्याचे, त्यामुळे ते ओळखीचे वाटत होते. त्यामुळे ती त्यांच्यासोबत पत्ता दाखवायला गेले. त्या ठिकाणी पोहोचता-पोहोचता संध्याकाळ झाली. राजूला तिथून घरी यायला निघाले तर त्यांनी आता खूप उशीर झाला आहे, उद्या जा असे सांगितले. राजुला घाबरली होते. पण एवढ्या उशिरा रानातून जाणेही धोकादायक होते. म्हणून त्या रात्री तिथेच राहिली.

या भयानक अनुभवाविषयी सांगताना राजुला म्हणाली, दुसऱ्या दिवशी रात्री तिथून निघाले तेंव्हा त्या लोकांनी मला सांगितले कि ते लोक नक्षलवादी आहेत. आता जर मी बाहेर गेले तर पोलीस मला पकडतील कारण मी एक रात्र त्यांच्यासोबत राहिले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार आता मी त्यांच्या गटात सामील झाले होते. त्यानंतर जवळ-जवळ ५ ते ६ वर्ष त्यांचा सोबत होते. त्यांनी मला बंदूक चालवायचे प्रशिक्षण दिले. त्यांच्यासोबत मी काही ऑपरेशन्स मध्येही सहभागी झाले होते. पोलिसांवरही गोळीबार केला होता. पण मला ही मनापासून करायची नव्हती. शेवटी एक दिवस मला संधी मिळाली आणि मी तिथून पळ काढला. मी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले, असे राजुलाने सांगितले.

शाळा व्यवस्थापनच ठरवणार गणवेशाचा रंग

राजुलाबद्दल बोलताना गोंदियाचे ऍडिशनल सुप्रिटेंडन्ट ऑफ पोलीस अशोक बँकर म्हणाले, "२०१८ साली राजुलाने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. राजुलाला पुढे शिकण्याची इच्छा होती आणि तिचे लहान वय पाहता तेव्हाचे ऍडिशनल सुप्रिटंडन्ट ऑफ पोलीस संदीप आठोले यांनी तिचे पालकत्व स्वीकारले. राजूला १० वी मध्ये ५० टक्के गुण मिळाले होते. आता १२ वी मध्ये ४५ टक्के गुण पडले आहेत." कधी काळी पोलिसांवर बंदूकीने निशाणा साधणाऱ्या राजुलाला आता पोलिसांत भरती व्हायचे आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2