किरीट सोमय्या यांची न्यायालयीन चौकशी करण्याचे हाय कोर्टाचे आदेश
ईडीचा ससेमिरा पाठी लावण्यासाठी माझ्याविरोधाच ‘हेतुपुरस्सर’ गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला. तसेच हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिकाही उच्च न्यायालयात दाखल केली. यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने हसन मुश्रीफ यांना दिलासा देत किरीट सोमय्या यांनाच झटका दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालय (ईडी), सीबीआय, इन्कम टॅक्सचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर केला जात आहे.तसेच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनेक विरोधाकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून महत्त्वाची कागदपत्रे त्यांच्या हातीशी लागतात, असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला. यात आता मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवरील सुनावणीवेळी किरीट सोमय्या यांची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.पुणे सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
ईडीने अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर छापेमारी केली होती. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यावर ईडीचा ससेमिरा पाठी लावण्यासाठी माझ्याविरोधाच ‘हेतुपुरस्सर’ गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला. तसेच हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिकाही उच्च न्यायालयात दाखल केली. यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने हसन मुश्रीफ यांना दिलासा देत किरीट सोमय्या यांनाच झटका दिला आहे.
हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून येत्या २४ एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे मुंबई उच्च न्यायालाने पोलिसांना आदेश दिले आहेत.तर हसन मुश्रीफांवर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.