पदवीधर व शिक्षक मतदार नाव नोंदणी कशी करावी? कोण असणार पात्र..
मुंबई आणि कोकण विभागात पदवीधर तसेच मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणुक झाली आहे. त्या पार्श्वभुमीवर पदवीधर आणि शिक्षक आमदार निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी कशी करावी?
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या (Graduate and Teacher Constituencies) चार जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) निवडणूक कार्यक्रम जाहीर (Election program announced) केला. मुंबई आणि कोकण विभागात पदवीधर तसेच मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणुक झाली आहे. त्या पार्श्वभुमीवर पदवीधर आणि शिक्षक आमदार निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी (Voter Name Registration) कशी करावी? त्यासाठी कोण पात्र असणार आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेवू.
पदवीधर मतदार नोंदणीकरिता पात्रता
तो भारताचा नागरीक असावा. तो मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्या किमान ३ वर्षापूर्वी, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा तत्सम विद्यापीठाचा पदवीधर असावा. सर्वासाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवाशी असावा. त्याने विहित कागदपत्रांसह फाॅर्म क्र. १८ भरावा. पदविका (Diploma) जर पदवीतूल्य असेल तरच पदवीधर गृहीत धरण्यात येईल.
शिक्षक मतदार नोंदणीकरिता पात्रता
तो भारताचा नागरीक असावा. त्याने मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्या लगतच्या ६ वर्षात किमान ३ वर्षे माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून पूर्णवेळ काम केलेले असावे. त्याने विहित कागदपत्रांसह फाॅर्म क्र. १९ भरावा.
शिक्षक आणि पदवीधर मतदार नोंदणीकरिता आवश्यक कागदपत्रे
रहिवाशी पुरावा (पासपोर्ट, वाहन परवाना, टेलीफोन बील, लाईट बील याशिवाय मान्यताप्राप्त कागदपत्रांची छायांकित प्रत), मार्कशीटची साक्षांकित प्रत,पदवी/पदविकेची साक्षांकित प्रत. ओळखपत्र, शिक्षण असल्यास नोकरी करीत असल्याबाबत (आजी किंवा माजी) प्राचार्यांचे पत्र, विवाहित महिलेने विवाहानंतर नाव बदलले असल्यास त्याबाबतचे राजपत्र, पॅन कार्ड, राजपत्र नसल्यास प्रतिज्ञापत्र.
प्रमाणपत्रांचे साक्षांकन प्रती संबंधित जिल्ह्यात कार्यरत तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी, किंवा शासन मान्यता प्राप्त विद्यालयाचे प्राचार्य किंवा जिल्ह्यातील अन्य राजपत्रित अधिकाऱ्यांकडून करून घ्यावे.
पदवीधर व शिक्षक संपूर्ण मतदान प्रक्रिया जाणून घ्या.
मतदार नोंदणी अर्ज आणि कागदपत्राच्या साक्षांकित प्रती, आपल्या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO), सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO), किंवा अन्य नामनिर्देशित अधिकारी यांना समक्ष किंवा पोस्टानेही सादर केल्या जाऊ शकतात. शक्यतो ही कागदपत्रे समक्ष सादर करून त्यांची पोहोच घ्यावी. तसेच अद्ययावत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर, त्यात स्वतःचे नाव असल्याची खात्री करावी.