कॅनडा सरकारचे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी नवीन नियम; विद्यार्थ्यांना कॅम्पसबाहेर आठवड्यात २४ तास काम करता येणार 

कॅनेडियन ब्युरो फॉर इंटरनॅशनल एज्युकेशनच्या 2022 च्या अहवालानुसार, कॅनडात 3 लाख 19 हजार 130 ​​भारतीय विद्यार्थी होते.

कॅनडा सरकारचे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी नवीन नियम; विद्यार्थ्यांना कॅम्पसबाहेर आठवड्यात २४ तास काम करता येणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कॅनडा सरकारने (Government of Canada)आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी नवीन नियम (New rules)तयार केली आहे. या नियमानुसार आता आंतरराष्ट्रीय विद्यार्थी (International students) कॉलेज कॅम्पसबाहेर आठवड्यात 24 तास काम करू शकतात. सप्टेंबरपासून हा नियम लागू होणार आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना 20 तास कॅम्पसबाहेर काम (Off campus work) करण्याची परवानगी होती.

कॅनडाचे  इमिग्रेशन, शरणार्थी आणि नागरिकत्व मंत्री मार्क मिलर यांनी ही माहिती दिली आहे., "विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून आठवड्यातून 20 तासांपेक्षा जास्त काम करण्याची परवानगी देणारे तात्पुरते धोरण 30 एप्रिल रोजी संपेल. आता विद्यार्थ्यांनी कॅम्पसबाहेर काम करण्याच्या तासांची संख्या आठवड्यातून 24 तास करण्यात आली आहे."
मिलर म्हणाले, "येथे आलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याने येथे अभ्यास करायला यावे. विद्यार्थ्यांना आठवड्यातून 24 तास काम करण्याची परवानगी देणे म्हणजे ते त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. कॅम्पसबाहेर काम केल्याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मदत होते. विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव मिळविण्यात मदत होते आणि इतर  खर्च ही भागतो."

कॅनेडियन ब्युरो फॉर इंटरनॅशनल एज्युकेशनच्या 2022 च्या अहवालानुसार, कॅनडात 3 लाख 19 हजार 130 ​​भारतीय विद्यार्थी होते. येथील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.