भारतात ८३% सुशिक्षित बेरोजगार तरुण, हा दुर्दैवी आकडा : जयंत पाटील 

२००० सालच्या तुलनेत २०२२ साली सुशिक्षित बेरोजगारांची संख्या जवळजवळ दुपटीने वाढून ६५.७% झाली आहे.

भारतात ८३% सुशिक्षित बेरोजगार तरुण, हा दुर्दैवी आकडा : जयंत पाटील 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (International Labor Organization) ने दिलेल्या रिपोर्टनुसार देशातील बेरोजगारांमध्ये ८३% युवक (83% unemployed in the country) आहेत. त्यातही सुशिक्षित बेरोजगारांची संख्या अधिक आहे. २००० वर्षांच्याच्या तुलनेत २०२२ मध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या जवळजवळ दुपटीने वाढून ६५.७% झाली आहे. हा रिपोर्ट जितका धक्कादायक आहे तितकाच दुर्दैवी असल्याचे माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंट (X social media account) वर म्हटले आहे.  

शासकीय पदांसाठीच्या भरती प्रक्रिया रखडल्या आहेत. परीक्षांमध्ये सर्रास घोटाळे होत आहेत. वेदांता, फॉक्सकॉन सारखे मोठे प्रकल्प राज्याबाहेर आंदण म्हणून दिले जात आहेत. तरुणांच्या बेरोजगारीशी संलग्न असे कितीतरी प्रश्न उपस्थित होत आहेत. तरुणांचे बिघडणारे मानसिक स्वास्थ्य, त्यामुळे वाढत असलेली गुन्हेगारी या समस्या तर दुर्लक्षितच आहेत, असे पाटील म्हणाले.