मतदान करणाऱ्या पालकांच्या मुलांना मिळणार अतिरिक्त 10 गुण
लखनऊ मधील सेंट जोसेफ कॉलेजने या संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे (loksabha election)वातावरण तापले आहे, पण मतदानाची घसरती आकडेवारी चिंतेचा विषय ठरत आहे. हे मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशातील एका शाळेने अनोख शक्कल लढवली आहे.मुलांना 10 अतिरिक्त गुण (additional 10 marks)देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, असे गुण वाढवता येतात का ? हा सुध्दा चर्चेचा विषय बनला आहे.
लखनऊ मधील सेंट जोसेफ कॉलेजने या संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक मतदान (Children of voting parents) करतील अशा विद्यार्थ्याना परीक्षेत अतिरिक्त 10 गुण दिले जातील. एव्हढेच नाही तर निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा अतिरिक्त पगारही दिला जाणार आहे.
सेंट जोसेफ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे व्यवस्थापकीय संचालक अनिल अग्रवाल म्हणाले, "शाळेने दिलेले 10 अतिरिक्त गुण एकाच विषयात असू शकतात किंवा 10 अतिरिक्त गुण एकत्रितपणे सर्व विषयांमध्ये दिले जाऊ शकतात. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे."
लखनऊच्या लोकसभा जागेसाठी 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. 5 व्या टप्प्यात देशातील एकूण 49 लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे. लखनौ लोकसभा सीटचा देशातील हॉट सीटमध्ये समावेश होतो. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह येथून निवडणूक लढवत आहेत.