राज्यांतील सर्व बोर्ड 'परख' एकाच व्यासपीठावर ; दहावी-बारावीच्या परीक्षेत होणार बदल      

परफॉर्मन्स असेसमेंट ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट (परख) या प्लॅटफॉर्मवर सर्व बोर्डांना एकत्र आणले जात आहे.    

राज्यांतील सर्व बोर्ड 'परख' एकाच व्यासपीठावर ; दहावी-बारावीच्या परीक्षेत होणार बदल      

राहुल शिंदे                           

  10th-12th Exams : दहावी-बारावीच्या परीक्षा घेणारी देशभरात  ६०  बोर्ड (60 boards across the country) आहेत. या बोर्डांना 'परख'च्या  (Performance Assessment, Review and Analysis of Knowledge for Holistic Development) (PARAKH) माध्यमातून एकाच व्यासपीठावर आणून त्यांची मूल्यमापन पद्धती समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.तसेच यापुढील काळात केवळ विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता तपासण्यावर अधिक भर दिला जाणार आहे, असे एनसीईआरटीच्या प्राध्यापिका रंजना अरोरा NCERT Professor Ranjana Arora यांनी सांगितले.

 पुणे एज्युकेशन फोरमच्या माध्यमातून पुण्यातील पत्रकारांनी दिल्ली येथील एनसीईआरटीच्या मुख्य कार्यालयात जाऊन एनसीईआरटीच्या शैक्षणिक कामांची तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची माहिती जाणून घेतली.यावेळी रंजना अरोरा पत्रकारांशी बोलत होत्या.

    सीबीएसई , आयसीएसई, आयबी यांसह प्रत्येक राज्यांमधील बोर्डाकडून दहावी- बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. सद्यस्थितीत या बोर्डाच्या मूल्यमापनात व प्रश्नपत्रिकेत कोणतेही साम्य नाही. प्रत्येक बोर्ड आपापल्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांचे मूल्यमापन करून निकाल जाहीर  करत आहे. परंतु, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रथमच देशभरातील सर्व बोर्डांच्या परीक्षा व मूल्यमापनाबाबत विचार होत आहे. परफॉर्मन्स असेसमेंट ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट (परख) या प्लॅटफॉर्मवर सर्व बोर्डांना एकत्र आणले जात आहे.                                 
    रंजना अरोरा म्हणाल्या, देशभरातील सर्व बोर्डांना एका व्यासपीठावर आणून परीक्षांमध्ये समानता आणणे हे एक आव्हानच आहे.पण त्याकडे संधी म्हणून पाहता येऊ शकते. यामुळे सर्वच मुलांचा फायदा होणार आहे. मूल्यमापनाबरोबरच प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्येही बदल करण्याचा विचार सुरू आहे. यापुढे प्रश्नपत्रिकातून विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या क्षमता तपासण्यावर भर असेल. सोशल इमोशन डेव्हलपमेंट, सायको मोटिव्ह डेव्हलपमेंट, एसएसटी कल्चर डेव्हलपमेंट आदी बाबत येथे विचार होत आहे. प्रश्नांबरोबरच विविध सराव किंवा ॲक्टिव्हिटी सुद्धा क्षमतांची चाचणी करणाऱ्याच असतील.अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांसमोर सुध्दा हे मोठे आव्हान असेल.