YCMOU ची प्रवेश प्रक्रिया सुरू; ऑनलाइन अर्ज करण्याची ३१ जुलैपर्यंत संधी

मुक्त विद्यापीठातील विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान, आरोग्यविज्ञान, निरंतर शिक्षण, संगणकशास्त्र, कृषी विज्ञान शाखेतील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.

YCMOU ची प्रवेश प्रक्रिया सुरू; ऑनलाइन अर्ज करण्याची ३१ जुलैपर्यंत संधी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील (YCMOU) विविध अभ्यासक्रमांसाठी (Open University Courses) प्रवेश प्रक्रिया सुरू (Start the admission process) करण्यात आली आहे. मुक्त विद्यापीठातील विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान, आरोग्यविज्ञान, निरंतर शिक्षण, संगणकशास्त्र, कृषी विज्ञान शाखेतील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी (Diploma, Degree and Post Graduate Courses) विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाणार असून विद्यार्थ्यांना येत्या ३१ जुलैपर्यंत नोंदणी (Registration till 31st July) करता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्णयानुसार दूरस्थ आणि ऑनलाइन पद्धतीने मिळणाऱ्या पदवीला आता नियमित पद्धतीने चालणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाची समकक्षता दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा दूरस्थ किंवा ऑलाइन पद्धतीने शिक्षण घेण्याचा कल वाढत आहे. विद्यापीठ किंवा महाविद्यालयात पूर्ण वेळ पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्यांना, या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून पदवीचे शिक्षण घेता येते. 

मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कमी शुल्कात चांगले शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध आहे, असे विद्यापीठ प्रशासनानेस्पष्ट केले आहे.  विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागतील. त्यानंतर अभ्यासक्रमानुसार अभ्यास केंद्र निवडण्याची आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती मुक्त विद्यापीठाच्या www.ycmou.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना जवळच्या अभ्यास केंद्रात आणि विद्यापीठाच्या विभागीय केंद्रात संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.