गट 'क' च्या जागा MPSC मार्फत भरणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

त्याबाबत नुकताच राज्याच्या कॅनिनेटमध्ये निर्णय झाला आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील याबाबत तयारी दर्शवली असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

गट 'क' च्या जागा MPSC मार्फत भरणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

एज्युवार्त न्यूज नेटवर्क 

मागील काही वर्षापासून स्पर्धा परीक्षांमध्ये (Competitive Examination) होत असलेल्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकार आता अॅक्शन मोडवर आले आहे. गट 'क' वर्गातील सर्व जागा टप्याटप्याने एमपीएससी मार्फत (Group C Examination MPSC) भरल्या जाणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केली. त्याबाबत नुकताच राज्याच्या कॅनिनेटमध्ये निर्णय झाला असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील याबाबत तयारी दर्शवली असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मागील काही दिवसांपासून लोकांची मागणी होती त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व विभागाची यादी माझ्याकडे आहे. टीसीएस आणि आयबीपीएस या दोन्ही संस्थांनी परीक्षा घेतल्या आहेत. पेपरफुटी बाबत जो एफआयआर झाला त्या बाबत मी बोललो आहे. एखाद्या ठिकाणी गडबड करण्याचा प्रयत्न झाला तो आम्ही हाणून पाडला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. 

पेपरफुटीच्या प्रकरणात आपण कारवाई केलेली आहे. केवळ एक गुन्हा दाखल झालाय मात्र दुसरा कुठलाही गुन्हा आतापर्यंत दाखल झालेला नाही, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. आतापर्यंत आपण 75 हजार ची भरती घोषित केली होती. त्यापैकी सरकार आल्यानंतर 57 हजार 452  जणांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.  

पेपर फुटी बाबत केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील कायदा करण्याचा मनोदय मागच्या अधिवेशनात केला आहे. या अधिवेशनात पेपरफुटी विरोधात कायदा करणार असल्याच देवेंद्र फडणवीस म्हणाले.