विद्यापीठातील 'जी २०' खर्चाची काढणार श्वेतपत्रिका ; विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत निर्णय

विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत कुलगुरू यांनी स्वतः लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले. तक्रार निवारण समितीचा विषय मार्गी लावून विद्यार्थ्यांना त्वरित सुधारित निकाल देण्याबाबत परीक्षा विभागाला निर्देश देण्यात आले.

विद्यापीठातील 'जी २०' खर्चाची काढणार श्वेतपत्रिका ; विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University, formerly the University of Pune) ' जी 20' (G20) च्या आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमावर झालेल्या खर्चाची श्वेता पत्रिका ( A white paper ) काढण्याचा निर्णय शनिवारी व्यवस्थापन परिषदेच्या (Management Council ) बैठकीत घेण्यात आला. तसेच गरजू विद्यार्थ्यांना वसतीगृह देणे, वसतिगृहांची क्षमता वाढवणे, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेच्या व शिक्षणाच्या अडचणी सोडवणे आदी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.त्याचप्रमाणे विद्यापीठात नियमबाह्य पद्धतीने भरती आरोप झालेल्या २७ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या ठरावाला स्थगिती देण्यात आली.

हेही वाचा : शिक्षण IIT मुंबईला अनामी देणगीदाराकडून १६० कोटी रुपयांची देणगी

विद्यापीठाच्या प्रलंबित प्र- कलगुरू नियुक्ती बरोबरच इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत चर्चा करण्यात आली. मागील व्यवस्थापन परिषदेमध्ये विद्यापीठात झालेल्या नियमबाह्य भरती घोटाळ्यावर वादळी चर्चा झाली होती. त्याचीच री ओढत शनिवारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. बैठकीत व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी प्रशासनाला धारेवर धरले तर राजेंद्र विखे पाटील, बागेश्री मंठाळकर, धोंडीराम पवार, आदी सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली.

विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत कुलगुरू यांनी स्वतः लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले. तक्रार निवारण समितीचा विषय मार्गी लावून विद्यार्थ्यांना त्वरित सुधारित निकाल देण्याबाबत परीक्षा विभागाला निर्देश देण्यात आले.

नॅक विषयात काम करण्यासाठी नियोजनबद्ध तयारी करण्यावर व्यवस्थापन परिषदेत सविस्तर चर्चा झाली. वर्षभरापासून रखडलेल्या विविध समित्यांवर नियुक्ती करून विद्यापीठाच्या कामकाजाला गती देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.तसेच अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील उपकेंद्रांच्या सहाय्यक कुलसचिव पदाची जाहिरात काढून तात्काळ नियुक्ती करण्यावर निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे दूर शिक्षण अभ्यासक्रमाच्या परीक्षा त्वरित घेऊन नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवण्याबाबत निर्देश देण्यात आले.

------------------

" विद्यार्थी आणि विद्यापीठ हित जोपासणे हे कुलगुरूंसह आमचे सर्वांचे ध्येय आहे. कुठे काही चुकीचे, संशयास्पद झालंय अस असेल तर पारदर्शकता ठेवली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आजचे झालेले सर्व निर्णय हा त्याचाच भाग आहे.विद्यार्थ्यांच्या हिताबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही."

- सागर वैद्य ,सदस्य, व्यवस्थापन परिषद,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

हेही वाचा : शिक्षण IIT मुंबईला अनामी देणगीदाराकडून १६० कोटी रुपयांची देणगी