मगर महाविद्यालयात भरला शंभर क्रीडा स्पर्धांचा महाकुंभ

पुण्यातील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ‘ए. एम. एम. स्पोर्ट्स कार्निवल २०२३’ अंतर्गत शंभर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

मगर महाविद्यालयात भरला शंभर क्रीडा स्पर्धांचा महाकुंभ
Annasaheb Magar College Sports Carnival

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात (Annasaheb Magar College) ‘ए. एम. एम. स्पोर्ट्स कार्निवल २०२३’ (Sports Carnival) अंतर्गत शंभर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धांचा पुरस्कार वितरण समारंभ महाविद्यालयात नुकताच पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते रणजित चामले (Ranjeet Chamale) उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यायाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते. महाविद्यालयात आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा पाहिल्या तर हे क्रीडा महाविद्यालय आहे की काय असे वाटते, अशी भावना रणजित चामले यावेळी व्यक्त केली. महाविद्यालयात क्रीडा संस्कृती तयार होणे महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी या क्रीडा कार्निवलचा निश्चितच उपयोग होईल, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घोरपडे यांनी व्यक्त केले.

शिक्षण व क्रीडाविषयक बातम्यांसाठी येथे क्लिक करा. https://eduvarta.com/

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाररिक शिक्षण संचालक प्रा. प्रीतम ओव्हाळ यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप, विज्ञान विभागाच्या समन्वयक डॉ. नेहा पाटील,  डॉ. नाना झगडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिमखाना विभागातील खेळाडूंनी केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2