अखिल भारतीय आयुष पीजी प्रवेश परीक्षेसाठी प्रवेशपत्र प्रसिद्ध 

उमेदवारांना NTA चे अधिकृत संकेतस्थळ exams.nta.ac.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना लॉगिन तपशील प्रविष्ट करावे लागतील. ही प्रवेश परीक्षा 6 जुलै 2024 रोजी नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल.

अखिल भारतीय आयुष पीजी प्रवेश परीक्षेसाठी प्रवेशपत्र प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा (AIAPGET) 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे प्रवेशपत्रे प्रसिद्ध (Admit cards released) करण्यात आले आहेत. उमेदवारांना NTA चे अधिकृत संकेतस्थळ exams.nta.ac.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना लॉगिन तपशील प्रविष्ट करावे लागतील. ही प्रवेश परीक्षा 6 जुलै 2024 रोजी नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल.

उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर जातील तेव्हा त्यांनी प्रवेशपत्राची प्रत आणि वैध ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र) सोबत ठेवावे जेणेकरून तुमची पडताळणी करता येईल. पूर्ण प्रवेशपत्र आणि ओळखपत्राशिवाय तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

असे डाउनलोड करा प्रवेशपत्र

AIAPGET ऍडमिट कार्ड 2024 डाउनलोड करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/AIAPGET/ ला भेट द्या. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील प्रवेश पत्र डाउनलोड येथे क्लिक करा. आता पुढील पृष्ठावर, अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि दिलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. यानंतर तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर उघडेल जिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंटआउट घेऊ शकता.

उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यात काही अडचण आल्यास, ते aiapget@nta.ac.in येथे NTA हेल्प डेस्क क्रमांक 011-40759000 वर संपर्क साधू शकतात, असे एनटीए कडून सांगण्यात आले आहे.