फडणवीस राहुल कुल यांची ईडीमार्फत चौकशी करणार का ?
कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल असून त्यांनी ५०० कोटींची मनी लाँड्रीग केल्याचा दावा राऊतांनी केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुल यांची ईडी आणि सीबीआय मार्फेत चौकशी करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
दौंड येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात आमदार राहुल कुल यांनी भष्ट्राचार केल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल असून त्यांनी ५०० कोटींची मनी लाँड्रीग केल्याचा दावा राऊतांनी केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुल यांची ईडी आणि सीबीआय मार्फेत चौकशी करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून विरोधी पक्षातील नेत्यांच्या मार्फत चौकशा सुरू आहेत. केंद्र शासनाकडून स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असून याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधानांना पत्रही लिहिले आहे. त्यात आता संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.मात्र, कूल यांनी सर्व आरोप फेटाळले आहे. केवळ राजकीय आकसापोटी हे आरोप करण्यात आले आहेत.तसेच राऊत यांनी केलेले आरोप अपुऱ्या माहितीच्या आधारे केले असून त्यांनी केलेले आरोप खरे असतातच असे नाही,असे कूल यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, एका विशिष्ट गटाचा चोरमंडळ असा उल्लेख मी केला होता.विधिमंडळासाठी हा उल्लेख केला नाही,असे राऊत यांनी स्पष्ट केले होते.मात्र, विधिमंडळाचा अवमान केल्याप्रकरणी संजय राऊत यांना हक्क भंगाची नोटीस बजावण्यात आली आहे.राहुल कुल हे हक्क भंग कारवाई प्रक्रियेतील समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे राऊत यांनी हा आरोप केला असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. परंतु, कुल यांच्या संदर्भातील पुरावे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांना देण्यात आले होते. त्यांनी याबाबत पाठपुरावा करण्यास नकार दिला होता, असेही संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.