SPPU कर्मचारी क्रिकेट संघाचा परभणी संघावर दणदणीत विजय

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-20 क्रिकेट-2024 स्पर्धा

SPPU कर्मचारी क्रिकेट संघाचा परभणी संघावर दणदणीत विजय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गोंडवाना विद्यापीठ (Gondwan University) गडचिरोली यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-20 क्रिकेट-2024 स्पर्धेचा (T20 Cricket-2024 Tournament) अंतिम सामना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) विरुद्ध  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ(Marathwada Agricultural University)  परभणी या संघात झाला पार पडला. या अंतिम सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी क्रिकेट संघाने परभणी संघास 37 धावाने पराभूत करून विजेतेपद पटकावले.

दरम्यान, नाणेफेक जिंकून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने प्रथमतः फलंदाजी करत 147 धावांचे लक्ष्य दिले होते. परभणी विद्यापीठाच्या संघाने 147 लक्षाचा पाठलाग करताना  109/6 धावांपर्यंत  मजल मारता आली. चांगल्या गोलंदाजीच्या बळावर पुणे विद्यापीठाला हा एकहाती विजय संपादन करता आला. 

पुणे विद्यापीठ संघाच्या मनिष गायकवाडने सर्वाधिक 50 धावां केल्याने त्याला सामनावीर घोषीत करण्यात आले. त्यापाठोपाठ बसवंत गजलवार- 39, नितीन प्रसाद - 25 यांनी उत्तम खेळी केली. तर गोलंदाजीमध्ये सचिन सुर्वे- 3/19 , संतोष सुगावे 2/19 मनीष गायकवाडने 1/22  अशी उत्तर कामगिरी पार पाडली. 
 
तर परभणी विद्यापीठ संघाकडून धीरज पाथरीकर याने सर्वाधिक - 44 धावा रचला तर माणिक ढगे -22 आणि संतोष यादवने  15 धावांचे योगदान दिले. तर गोलंदाजीमध्ये मनोज 2/21, माणिक, जमीर व हनुमान - प्रत्येकी 01 विकेट्  घेतल्या. 

संक्षिप्त धावफलक : 

 पुणे विद्यापीठ : 20 षटकात 6 बाद 146 धावा :-
(मनिष गायकवाड - 50, बसवंत गजलवार- 39, नितीन प्रसाद - 25). 
 परभणी विद्यापीठ - मनोज 2/21, माणिक, जमीर व हनुमान - प्रत्येकी 01 विकेट् ).  

 परभणी विद्यापीठ -20 षटकात 6 बाद 106 धावा.

(धीरज पाथरीकर -44 , माणिक ढगे -22, संतोष यादव - 15 धावा)
*पुणे विद्यापीठ * - सचिन सुर्वे- 3/19 , संतोष सुगावे 2/19 मनीष गायकवाड 1/22 )

 सामनावीर - मनीष गायकवाड