मोबाईलचे व्यसन ड्रग्सपेक्षाही भयानक ; अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद यांचे मत

 प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलसोबत आम्ही सुमारे दीड वर्षांपासून काम करत असून या शाळेची कामगिरी कौतुकास्पद आहे,असे गौरव उद्गार काढून चिरंजीव प्रसाद यांनी काढले.

मोबाईलचे व्यसन ड्रग्सपेक्षाही भयानक ; अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद यांचे मत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुलांना मोबाईलपासून दूरच ठेवले पाहिजे.मोबाईलचे व्यसन (Mobile phone addiction)हे ड्रग्सपेक्षाही भयानक (dangerous than drugs)आहे.पालकांनी सुध्दा मोबाईलपासून दूर राहावे,तसेच प्रत्येकाची मातृभाषा ही चांगलीच असली पाहिजे.त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी गणित व इंग्रजी विषयाकडे (Mathematics and English subjects)अधिक लक्ष द्यायला हवे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुध्दा गणित, इंग्रजी आणि अभ्यासेतर उपक्रमांमध्ये चांगली कामगिरी करणे गरजचे आहे,असे मत राज्य राखीव पोलीस बलाचे अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद (Addl.Director General of Police Chiranjeev Prasad, SRPF, Maharashtra)यांनी केले.

वानवडी येथे  SRPF जवानांच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रियदर्शनी SRPF स्कूलच्या (Priyadarshani SRPF Primary School)उद्घाटन समारंभ प्रसंगी चिरंजीव प्रसाद बोलत होते.राज्य राखीव पोलीस बलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे, राज्य राखीव पोलीस बलाच्या कमांडन्ट  ग्रुप एक आणि दोनच्या नम्रता पाटील यांच्यासह प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे विश्वस्त डॉ.राजेंद्र सिंह, नरेंद्र सिंह, ॲकॅडमिक हेड डॉ.नीलम मूलचंदाणी, प्राचार्या अर्पिता दीक्षित व प्राचार्या डॉ.गायत्री जाधव यांच्यासह शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

 प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलसोबत आम्ही सुमारे दीड वर्षांपासून काम करत असून या शाळेची कामगिरी कौतुकास्पद आहे,असे गौरव उद्गार काढून चिरंजीव प्रसाद म्हणाले, शिवाजीनगर येथे पोलिसांच्या मुलांसाठी प्रियदर्शनीतर्फे उत्तम पध्दतीने शाळा चालवली जात आहे.तसेच वानवडी परिसर सुरू झालेली ही शाळा सर्वोत्तम शाळा म्हणून ओळखी जावी,अशी अपेक्षाही चिरंजीव प्रसाद यांनी व्यक्त केली.
 

अशोक मोराळे म्हणाले, पुढीची पिढी चांगली निर्माण व्हावी, या उद्देशाने ही शाळा सुरू झाली आहे.पालकांनी सुध्दा यात सहभाग घेऊन आदर्श शाळा निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.तसेच एसआरपीएफचे जवान सेवा बजावण्यासाठी कुटुंबापासून दूर असतात.मात्र,जवानांच्या आरोग्याची आणि त्यांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची काळजी घेण्याचे काम चिरंजीव प्रसाद यांनी नेमही केले आहे.याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे,असे गौरवउद्गार मोराळे यांनी काढले.

नम्रता पाटील, गुणवत्तापूर्ण शिक्षण महाग झाले असून एकदा शाळेत टाकल्यावर मुलांच्या शिक्षणाच्या शुल्कावर नियंत्रणही ठेवता येत नाही.पण आपलेच अधिकारी आणि आंमलदार यांच्या मुलांनासाठी शाळेच्या माध्यमातून ही चांगली सुविधा देत आहोत.ही सुविधा पुढे चांगली राहील याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.कारण पालकांचाही त्यात सहभाग असावा.पालक शिक्षक समितीच्या (पीटीए)माध्यमातून सुधारणा कराव्यात,अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

राजेंद्र सिंह म्हणाले, आमचे काम आम्ही भाषणात सांगणार नाही तर प्रत्येक दिवशी व प्रत्येक महिन्याला आणि वर्षाला ते तुम्हाला दिसून येईल. मुलांमध्ये झालेले शैक्षणिक परिवर्तन मुलांची वाढलेली शैक्षणिक गुणवता यातून आमचे काम दिसून येईल.तसेच पालक हा शाळेचा अविभाज्य भाग आहे,असे आम्ही समजतो.तसेच पालकांशी चर्चा करून मुलांना अधिक चांगले घडवण्याचा आमचा प्रयत्न राहिल. 

-------------------------------------------------

एसआरपीएफ प्रशासनातर्फे हडपसर, वानवडी, परिसरात सर्वात चांगली शाळा तयार करून दिली जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात या शाळेत एसआरपीएफ जवानांची मुले शिक्षण घेतीलच. त्या शिवाय बाहेरील मुलांना प्रवेशासाठी या शाळेत रांगेत उभे राहवे लागेल.अशा पद्धतीची दर्जेदार शाळा आपण निर्माण करू. या गोष्टीचा आपल्या सर्वांना अभिमान होईल,असा विश्वासही राजेंद्र सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.