सूर्याच्या उच्च-गुणवत्तेच्या रेडिओ प्रतिमा तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश
कमी वेळेत प्रतिमा निर्माण करणारी ही जगातील सर्वोत्तम दूरदर्शक सुविधा मानली गेली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स (NCRA), पुणे येथील संशोधकांच्या नेतृत्वाखालील सौर भौतिक शास्त्रज्ञांच्या गटाला सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील मीरकॅट रेडिओ दुर्बिणीचा (Meerkat radio telescope) वापर करत सूर्याची अपवादात्मक तपशिलवार रेडिओ प्रतिमा तयार करण्यात यश आले आहे. त्यात सूर्याची अभूतपूर्व अचूक आणि लहान वैशिष्ट्ये दिसून आली आहेत. कमी वेळेत प्रतिमा निर्माण करणारी ही जगातील सर्वोत्तम दूरदर्शक सुविधा मानली गेली आहे. खगोल शास्त्रज्ञांनी अनेक अडथळ्यावर मात करत ही सिध्यता मिळवली आहे.
या संशोधनातील प्रमुख वैज्ञानिक डाॅ. कंसाबनिक म्हणतात, "खरं तर सूर्य अभ्यास करण्यासाठी विशेषतः रेडिओ तरंग लांबीवर आश्चर्यकारकपणे आव्हानात्मक स्त्रोत आहे. "रेडिओ उत्सर्जन सूर्याच्या क्षीण वातावरणातून उद्भवते. सुर्याचा हा प्रदेश कोरोना म्हणून ओळखला जातो. जो केवळ ग्रहणाच्या वेळीच उघड्या डोळ्यांनी दिसतो. कोरोना हे पृथ्वीच्या पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या घटनेचे जन्मस्थान आहे. ज्याला आपण आता स्पेस वेदर म्हणून संबोधतो.
वैज्ञानिक डॉ. मोंडल म्हणतात, "सूर्याचे चित्र काढण्यासाठी अनेक गुंतागुंती आहेत," यातील एक म्हणजे सूर्याचे रेडिओ उत्सर्जन केवळ वेळेत फार लवकर बदलत नाही, तर ते एका तरंगलांबीपासून जवळच्या तरंगलांबीमध्ये नाट्यमयरित्या बदलू शकते." हे असे म्हणण्यासारखे आहे की, रेडिओ तरंगलांबीवरील सूर्य एका सेकंदापेक्षा कमी वेळात आणि जवळच्या समान रंगाच्या छटांमध्येही खूप वेगळा दिसू शकतो.
दुसरीकडे बहुतेक रेडिओ दूरदर्शक त्यांच्याद्वारे सर्वोत्कृष्ट प्रतिमा तयार करण्यासाठी काही मिनिटे किंवा तासांपर्यंत कमकुवत रेडिओ स्रोतांकडे टक लावून पाहण्यासाठी विकसित केलेले आहेत. यामुळे सूर्यासाठी निर्माण होणाऱ्या प्रतिमा अस्पष्ट होतात. जसे की वेगात असलेली गाडी ठराविक फोटोंमध्ये अस्पष्ट दिसते. या समस्येला सामोरे जाण्यासाठी केवळ मोठ्या फ्रेम रेटसह चित्रपट तयार करणे आवश्यक नाही, तर सौर वातावरणात काय घडत आहे याचे तपशीलवार चित्र तयार करण्यासाठी मोठ्या संख्येने तरंगलांबींवरील निरीक्षण करणे आवश्यक आहे.