ध्येय शोधून त्याच दृष्टीने मुलांनी प्रयत्न करावा - वेणाभारती महाराज

कपिकुल सिद्धपीठच्या पिठाधीश्वरी सद्गुरु १००८ श्री वेणाभारती महाराज व त्यांच्या उत्तराधिकारी श्रीकृष्णमयी यांचे प्रबोधनपर व्याख्यान व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

ध्येय शोधून त्याच दृष्टीने मुलांनी  प्रयत्न करावा - वेणाभारती महाराज

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

जीवन घडवण्यासाठी ध्येय शोधून त्याच दृष्टीने मुलांनी व पालकांनी प्रयत्न करायला हवा यातच प्रगती सामावलेली असते असे सद्गुरु वेणाभारती महाराज (Sadguru Venabharati Maharaj) यांनी सांगितले आहे.  पुण्यातील (pune) राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंग (Rajiv Gandhi Academy of e-Learning school) या शाळेतील इयत्ता ५ ते १० वीच्या विद्यार्थी व पालकांसाठी(Students and parents) माजी उपमहापौर आबा बागुल (Former Deputy Mayor Aba Bagul) यांच्यामार्फत नाशिक (Nashik) येथील कपिकुल सिद्धपीठच्या पिठाधीश्वरी सद्गुरु १००८ श्री वेणाभारती महाराज व त्यांच्या उत्तराधिकारी श्री कृष्णमयी (Shri Krishnamayi) यांचे प्रबोधनपर व्याख्यान व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.   

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, सद्गुरु वेणाभारती महाराज यांनी विद्यार्थ्यांना झुकण्याचे महत्त्व सांगत आपण आपल्या सर्व व्यक्तींना, वस्तूंना आदर दिला पाहिजे.  तसेच आपले जुने संस्कार हीच आपल्या आयुष्याची खरी शक्ती आहे, सर्व पालकांनी आपल्या संस्कृतीचे पालन प्रथम आपल्या घरात केले तरच मुले त्यांचे अनुकरण करतील, आपल्या पाल्याला सर्व गोष्टी आल्या पाहिजे. या खटाटोपामध्ये खूप गोष्टी मुलांना सांगितल्या जातात तसे न करता मुलांचा कल, त्यांची आवड या सगळ्याचा विचार करून एकच कोणते तरी ध्येय जीवन घडवण्याकरिता शोधले पाहिजे, अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. या व्याख्यानानंतर पालकांनी, मुलांनी तसेच शिक्षकांनी आपल्या मनातील शंकेचे निरसन  केले.

श्रीकृष्णमयी यांनी, ओंकार साधनेचे महत्त्व सांगत आपल्यातील पाच तत्त्वांचे पंचमहाभूते यांची देखील ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. त्याचबरोबर सूर्याला अर्घ्य देण्याचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या अध्यात्मिक शक्तीचे, ईश्वराशी कृतज्ञ राहण्याचे महत्त्व सांगितले. तसेच ओंकाराचा योग्य उच्चार देखील सर्व उपस्थित मुलांकडून व पालकांना कडून करून घेतला.

यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल, जयश्री बागुल, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, शाळेचे प्राचार्य मसलकर, उपप्राचार्य रूपाली कदम, ज्येष्ठ पत्रकार विजय अंबाडे आदी मान्यवर उपस्थित होते.