भाववाढीची झळ पालकांच्या खिशाला; शालेय साहित्याच्या दरात वाढ 

मागील वर्षी १५० रुपये डझन असलेल्या वह्यांचे दर २०० च्या वर गेले आहेत तर ५ रुपयांचा पेन ७ रुपयांना झाला आहे. ३०० रुपये डझन असलेल्या रजिस्टरचे दर ३६० ते ३८० रुपयांवर गेले आहेत. २५० रुपयांचे दप्तर २६० ते २८० च्या घरात पोहोचले आहे.

भाववाढीची झळ पालकांच्या खिशाला;  शालेय साहित्याच्या दरात वाढ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील शाळ 15 जून पासून सुरू झाल्या असून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ (Academic year 2024-25) या शैक्षणिक वर्षात शालेय साहित्यांच्या (School material) बाजार पेठा फुलताना दिसत आहेत. मात्र, असे असले तरी यंदा शालेय साहित्यमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ (School material price hike) झाल्याचे दिसून येत आहे. परंतु, याचा फटका पालकांच्या खिशाला बसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी २० ते २५ टक्क्यांनी शालेय साहित्यामध्ये वाढ झाली आहे. 

मागील वर्षी १५० रुपये डझन असलेल्या वह्यांचे भाव २०० च्या वर गेले आहेत. तर ५ रुपयांचा पेन ७ रुपयांना झाला आहे. ३०० रुपये डझन असलेल्या रजिस्टरचा भाव ३६० ते ३८० रुपयांवर गेला आहे. तर २५० रुपयांचे दप्तर २६० ते २८० च्या घरात पोहोचले आहे. ३ रुपयांची पेन्सिल ५ रुपयांना, १० रुपयांचा पेन १२ ते १५ पंधरा रुपयांवर पोहोचला आहे. साध्या वह्यांच्या तुलनेत नामांकित कंपनीच्या वह्यांच्या डझन मागे ६० ते १०० रुपये भाववाढ झाली आहे. शिवाय कंपास पेटी व इतर शालेय साहित्यांमध्ये २० ते २५ टक्क्याने वाढ झाली आहे. 

_______________________

दुकानांमध्ये शेकडो प्रकारचे दप्तर उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. महागाईची छळ आता पालकांना देखील बसताना  दिसत आहे. असे असले तरीही शैक्षणिक साहित्य खरेदी करणे गरजेचे असल्याने हे साहित्य खरेदी करावेच लागत आहे. 
रामा वगरे (पालक)

_________________________

शालेय साहित्याच्या दरात वाढ झाली असली तरी सर्वच गोष्टींमध्ये झाली आहे. कागद, शाई, प्रिंटिंग यांचे भाव वाढल्याने आम्हाला १२० रुपये डझन मिळणाऱ्या वह्या १५० रुपयांवर गेल्या आहेत. पेन, पेन्सिल, स्कुल बॅग, इतर सर्वच साहित्य हे कंपनीकडून महागात मिळत आहे. त्यामुळे आम्हाला ते मागील वर्षांच्या तुलनेत ग्राहकांना दरवाढ करुनच  विकावे लागत आहे. 
 सुनिल भातुसे (विक्रेते)