मुकुंद किर्दत यांची आम आदमी पक्षाच्या राज्य प्रवक्ते पदी नेमणूक

उच्च शिक्षित अभियंते व व्यावसायिक असलेले मुकुंद किर्दत अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळींबरोबर जोडलेले आहेत. स्त्री पुरुष समानता हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे.

मुकुंद किर्दत यांची आम आदमी पक्षाच्या राज्य प्रवक्ते पदी नेमणूक
Mukund Kirdat

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

आम आदमी पक्षाच्या (AAP) महाराष्ट्र राज्य प्रवक्ते पदी पुण्यातील मुकुंद किर्दत (Mukund Kirdat) यांची नेमणूक जाहीर करण्यात आली आहे. गुजरातचे नेते गोपाल इटालिया यांनी आप महाराष्ट्राचे (Maharashtra) सह प्रभारी पद घेतल्यावर पक्ष संघटनेमध्ये अनेक बदल केले आहेत. त्यानुसार ही नेमणूक करण्यात आली आहे.

 

उच्च शिक्षित अभियंते व व्यावसायिक असलेले मुकुंद किर्दत अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळींबरोबर जोडलेले आहेत. स्त्री पुरुष समानता हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. गेली नऊ वर्षे आप बरोबर कार्यरत असून शिक्षण क्षेत्रात त्यांचे विशेष काम आहे.

 

पुणे महानगरपालिका संबंधित मुख्यत्वे ॲमिनिटी स्पेस, अग्निशमन वाहन घोटाळा, टोल प्रश्न, कंत्राटी भरती आदी प्रश्नांवरती आंदोलने केली आहेत.  तसेच त्यांनी २०१९ मध्ये आप तर्फे शिवाजीनगर विधानसभा निवडणुक लढवली आहे. यापूर्वी त्यांनी पुणे शहर व पुणे विभागाची तसेच आप राज्य मीडिया टीमची जबाबदारी सांभाळली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO