SSC Result Update : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर; निकालात तीन टक्क्यांची घसरण, पाहा आणखी ठळक वैशिष्ट्ये...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यानंतर ऑनलाईन निकाल पाहता येईल.

SSC Result Update : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर; निकालात तीन टक्क्यांची घसरण, पाहा आणखी ठळक वैशिष्ट्ये...
SSC Board Result Update

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

SSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (SSC Board) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC Result) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा एकूण निकाल ९३.८३ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात जवळपास तीन टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल ९६.९४ टक्के एवढा होता.

यंदाही कोकण विभाग (Kokan Division) अव्वल ठरला आहे. तर बारावी परीक्षेप्रमाणेच दहावीतही मुलींनीच बाजी मारली. (Maharashtra SSC Result) 

राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख २९ हजार ०९६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.११ टक्के इतका आहे. नागपूर विभाग तळात राहिला आहे. 

SSC Result : पुरवणी परीक्षा, गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनाचे घरबसल्या भरा अर्ज; इथे वाचा सविस्तर माहिती

बारावीनंतर दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८७ एवढी असून मुलांची टक्केवारी ९२.०५ एवढी आहे. 

निकालाची ठळक वैशिष्ट्ये -

एकूण निकाल - ९३.८३ टक्के

निकालात घट - ३.११ टक्के

परीक्षेला बसलेले विद्यार्थी - १५ लाख २९ हजार ०९६ 

परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी - १४ लाख ३४ हजार ८९८

मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी - ९५.८७ टक्के

मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी - ९२.०५ टक्के

प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण - ४ लाख ८९ हजार ४५५

प्रथम श्रेणीत उत्तीर्ण - ५ लाख २६ हजार २१०

दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी - ९२.४९ टक्के

कोकण विभाग अव्वल - ९८.११ टक्के 

नागपूर विभाग विभाग तळात -  ९२.०५ टक्के

विषयांचा निकाल - २५ विषयांचा १०० टक्के

शाळानिहाय - ६ हजार ८४४ शाळांचा निकाल १०० टक्के

इयत्ता दहावीचा विभागनिहाय निकाल :

कोकण – ९८.११ टक्के 
पुणे – ९५.६४ टक्के 
कोल्हापूर – ९६.७३ टक्के 
अमरावती – ९३.२२ टक्के 
नागपूर – ९२.०५ टक्के
लातूर -  ९२.६७ टक्के
मुंबई – ९३.६६ टक्के
नाशिक -  ९२.२२ टक्के
औरंगाबाद – ९३.२३ टक्के

अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे -

१. www.mahresult.nic.in

२. http://sscresult.mkcl.org

३. https://ssc.mahresults.org.in

 https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board

५. https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-10th-rrsult-2023

६. http://mh10.abpmajha.com

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo