बदलत्या काळानुसार कौशल्य आत्मसात करून स्वत:ला अपडेट ठेवा : प्रा. टी. जी. सीताराम 

देशातील तब्बल 26.5 कोटी विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात.मात्र, त्यातील केवळ 4.3 कोटी विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत पोहचतात.भारताचा जीईआर 28.3 टक्के एवढा आहे.

बदलत्या काळानुसार कौशल्य आत्मसात करून स्वत:ला अपडेट ठेवा : प्रा. टी. जी. सीताराम 


एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, क्वांटम कम्प्युटिंग, डेटा सायन्स  (Artificial Intelligence, Robotics, Quantum Computing, Data Science)आदीमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक बदल झाले असून त्याचा परिणाम शिक्षण व रोजगावर (Education and employment) झाला आहे.त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांनी (Teachers and students) बदलत्या काळानुसार विविध कौशल्य आत्मसात करून स्वत:ला अपडेट ठेवले पाहिजे.आधुनिक तंत्रज्ञानातील (Modern technology) बदलत चाललेल्या गोष्टी आत्मसात केल्याशिवाय आता पर्याय नाही.तसेच अध्ययन व अध्यापनातही पारदर्शकता आणावी (Transparency should also be brought in studies and teaching)लागणार आहे, असे मत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष  प्रा. टी. जी. सीताराम (AICTE President Prof. T. G. Sitaram) यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 124 व्या पदवी प्रदान समारंभात प्रा. टी. जी. सीताराम बोलत होते.कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी,  प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे आणि परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रमोद पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन  विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. यशोधन मिठारी, मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता व प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, अंतरविद्या अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.प्रभाकर देसाई,व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, यांच्यासह विद्यार्थी व विविध अधिकार मंडळाचे सदस्य उपस्थित होते.


 सीताराम म्हणाले, देशातील तब्बल 26.5 कोटी विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात.मात्र, त्यातील केवळ 4.3 कोटी विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत पोहचतात.भारताचा जीईआर 28.3 टक्के एवढा आहे. अनेक देशांचा जीईआर 80 टक्क्यांपर्यंत आहे.त्यामुळे शालेय शिक्षण घेणारे इतर विद्यार्थी कुठे जातात , यांचा शोध घेऊन त्यांना कौशल्य शिक्षण देण्याची आवश्यकता आहे.तसेच देशात आणखी एक हजार विद्यापीठांची स्थापना करून जीईआर 50 टक्के वाढवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान आपल्या समोर आहे. 


भारत देश रिसर्च अँड इनोव्हेशनमध्ये आघाडीवर आहे.पेटंट राजिसटेशनमध्ये व पीएच.डी.मध्ये भारताचा चौथा क्रमांक आहे, असे नमूद करून सीताराम म्हणाले,  केवळ आयआयटीमधूनच नाही तर देशभरातील इंजिनिअरिंग कॉलेजमधून लाखो इंजिनियर बाहेर पडतात.त्यांनीच इस्त्रो सारख्या संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदावर   जबाबदारी स्वीकारली आहे.तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये भारतीय इंजिनियर यांनीच मोठ्या पदावर काम करून कंपनीचा नाव लौकिक वाढवला आहे.त्यामुळे भारतीय तरुणांना उज्जवल भवितव्य आहे.भारतीय तरुणांनी कौशल्य आत्मसात करावे आणि जगभराला कौशल्य द्यावे.

कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना विद्यापीठाच्या विकासाचा आढावा घेतला.तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यापीठाच्या १२४ व्या पदवी प्रदान समारंभात विविध विद्याशाखांमधील ४ हजार ८१४ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, २ हजार २० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, ३५ विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्र, २३९ विद्यार्थ्यांना पीएच.डी., १४ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी पदविका प्रमाणपत्र तर ३ विद्यार्थ्यांना एम.फिलचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच  विविध विद्याशाखांमधील गुणवंत ७१ विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते  ११७ सुवर्णपदके प्रदान करण्यात आले.