धोनीच्या चाहत्या विद्यार्थ्याला क्रिकेट प्रेम महागात पडले;पोलिसांकडून गुन्हा दाखल
मैदानात धोनीला भेटण्यासाठी एका चाहत्याने सर्व सुरक्षा व्यवस्था तोडून मैदानात जाऊन त्याच्या पाया पडला. जयकुमार जानी असे त्या युवकाचे नाव आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सध्या सगळीकडे IPL चे वातावरण आहे. क्रिकेट चाहत्यांनी सुद्धा आपापल्या टीम आणि आवडत्या खेळाडूच्या पाठिंब्यासाठी कंबर कसली आहे. पण एम.एस. धोनीच्या एका फॅन (fan)लार त्याचे धोनी (dhoni)क्रिकेट प्रेम चांगलेच भोवले आहे.
IPL च्या 59 व्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यादरम्यान एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने मैदानात उडी घेत एक युवकाने धोनीला मिठी मारली. प्रेम व्यक्त करत अक्षरशः या युवकाने धोनीच्या पायावर लोटांगण घातले. हा युवक एक महाविदयालयीन विद्यार्थी असून त्याच्या या कृत्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदाबादचे एसीपी दिग्विजय सिंह राणा यांनी या विषयी अधिक माहिती देताना सांगितले की, गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात आणि चेन्नई यांच्यातील सामन्या दरम्यान जेव्हा खेळ थांबला, तेव्हा मैदानात धोनीला भेटण्यासाठी एका चाहत्याने सर्व सुरक्षा व्यवस्था तोडून मैदानात जाऊन त्याच्या पाया पडला. जयकुमार जानी असे त्या युवकाचे नाव आहे. सध्या तो शिक्षण घेत असून बीएच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध अतिक्रमण आणि बेकायदेशीर प्रवेशाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
दिग्विजय राणा म्हणाले की, 'प्राथमिक तपासात आम्हाला आढळून आले आहे की, तो विद्यार्थी कोणताही गुन्हा करण्याच्या हेतूने फिल्ड मध्ये गेला नव्हता. त्यामुळे सामन्यापणे अतिक्रमण आणि बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.'