मोठी बातमी :  डॉ. सुरेश गोसावी यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी  नियुक्ती 

तब्बल एक वर्षानंतर डॉ. सुरेश गोसावी यांच्या रूपाने पुणे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाले आहेत.

मोठी बातमी :  डॉ. सुरेश गोसावी यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी  नियुक्ती 
Dr. Suresh Gosavi

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी (New vice chancellor of savitribai phule pune university) डॉ.सुरेश गोसावी (Dr. Suresh Gosavi) यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल कार्यालयाने याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे तब्बल एक वर्षानंतर गोसावी यांच्या रूपाने पुणे विद्यापीठाला (pune university) पूर्णवेळ कुलगुरू मिळाले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अर्ज केलेल्या २७ उमेदवारांमधून कुलगुरू शोध समितीने पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.सुरेश गोसावी, पुणे विद्यापीठाच्या  वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा.अविनाश कुंभार, भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. संजय ढोले आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विजय फुलारी या पाच उमेदवारांची नावे शॉर्ट लिस्ट केली होती.

NIRF 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये मोठी घसरण; देशात ३५ व्या क्रमांकावर

शुक्रवारी (दि.२६ ) या पाचही उमेदवारांच्या मुलाखती राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी घेतल्या. त्यातून कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. सुरेश गोसावी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. डॉ. गोसावी यांनी एमएस्सी. पीएच. डी. पदवी मिळवली असून  त्यांनी विविध विषयांमध्ये संशोधन पेपर सादर केले आहेत. तर प्लाझ्मा पॉलिमरायझेशन वापरून लिथोग्राफी आणि नमुना हस्तांतरण, ड्राय इलेक्ट्रॉन बीम संश्लेषण, मल्टी-इलेक्ट्रॉन बीम लिथोग्राफी सिस्टम डिझाइन, नॅनोमटेरियल्स, नॅनोटेक्नॉलॉजी मायक्रो फ्लुइड क्स, सॉफ्ट लिथोग्राफी हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. 

"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून नेमणूक झाल्याने, आनंदित आहे. पुणे विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाची शैक्षणिक संकुल आणि संलग्न महाविद्यालयात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठोस प्रयत्न करणार आहे. विशेषकरून प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांमध्ये धोरणाची अंमलबजावणी करण्यावर लक्ष देणार आहे. पुणे विद्यापीठाची नॅशनल इन्स्टिट्यूटशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये ( एनआयआरएफ) शैक्षणिक गुणवत्तेत झालेली पडझड सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुणे विद्यापीठाची रँकिंग पूर्ववत करणे, यावर माझा फोकस राहणार आहे."

प्रा. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo