विजयानंद दुशिंग काळाच्या पडद्याआड; शिक्षण क्षेत्रातला उत्कृष्ट वक्ता हरपला

प्रा. दुशिंग यांचे इंग्रजी विषयावर विशेष प्रभुत्व होते. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात त्यांची उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून ख्याती होती.

विजयानंद दुशिंग काळाच्या पडद्याआड; शिक्षण क्षेत्रातला उत्कृष्ट वक्ता हरपला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे माजी सरचिटणीस (Former General Secretary of Pune District Junior College Teachers Association) प्रा. विजयानंद दुशिंग (Prof. Vijayanand Dushing) यांचे अल्पशा आजाराने निधन (passed away) झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रा. दुशिंग यांचे इंग्रजी विषयावर विशेष प्रभुत्व होते. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात (Abasaheb Garware College) त्यांची उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून ख्याती होती. ते उत्तम वक्ते देखील होते. आपल्या प्रभावी वक्तृत्वामुळे ते महाराष्ट्रातील शिक्षकांमध्ये प्रसिद्ध होते. आदर्श प्राध्यापकाबरोबरच "आपलं घर" या सामजिक संस्थेचे ते उपाध्यक्षही होते.    

संघटनेच्या सुरुवातीच्या काळात १९८० सालामध्ये दुशिंग हे पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस होते. त्यांच्या काळात जिल्हा संघटनेची अनेक आंदोलने झाली.  विशेषता शिक्षण संचालक कार्यालयासमोर त्यांनी केलेले आमरण उपोषण,  मोर्चे संप त्याचे समर्थपणे त्यांनी नेतृत्व केले आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली. त्यांचा बोलका स्वभाव, प्रभावी वक्तृत्व व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती संघटनेला लाभदायकच ठरली आहे. शिक्षण खात्यातील अधिकारी व शासकीय स्तरावर संघटनेचे प्रश्न कौशल्याने मांडून ते सोडविण्यात त्यांचा हातखंडा होता. संघटनेसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सेक्रेटरी प्रा. संतोष फाजगे , माजी सरचिटणीस प्रा. पंडितराव पाटील , प्रा.पवार एस.टी. , प्राध्यापक शहापुरे, पडवळ, प्रा. रोडे लक्ष्मण - विद्यमान अध्यक्ष, प्रा. विक्रम काळे विद्यमान सरचिटणीस,पुणे जिल्हा, पुणे विभागीय व राज्य महासंघाचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकारणी सदस्य व सभासद यांनी दुशिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.