विद्यार्थी स्वावलंबी व कौशल्यपूर्ण बनवणे NEP चे मुख्य उद्दिष्ट : डॉ. पराग काळकर

विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे, उद्याच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्य विकास गुण अंगीकारणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्देश आहे.

विद्यार्थी स्वावलंबी व कौशल्यपूर्ण बनवणे  NEP चे मुख्य उद्दिष्ट : डॉ. पराग काळकर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे (To make students self-reliant), उद्याच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्य विकास गुण अंगीकारणे (Adoption of skill development points) हा या धोरणाचा मुख्य उद्देश (main purpose)असे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर (Pro-Vice Chancellor Dr. Parag kalkar) यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी (National Education Policy) बोलताना सांगितले. 

कोंढवा येथील सिंहगड कॉलेज ऑफ कॉमर्स (Sinhagad College of Commerce) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विद्यापीठाच्या नियोजन व विकास विभागाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमाअंतर्गत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांच्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी व अभ्यासक्रम प्रारूप आराखडा या संदर्भात तालुकास्तरीय विशेष कार्यशाळा (workshop) घेण्यात आली होती.

काळकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या धोरणासाठी केलेल्या विविध उपाययोजना तसेच नवीन शैक्षणिक धोरण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आजपर्यंत झालेल्या विविध कार्यशाळा याविषयी माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

 विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे डीन डॉ. यशोधन मिठारे यांनीही पदवी विभागासाठी अभ्यासक्रम आराखडा यावर बोलताना, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासक्रमात होऊ घातलेले बदल व नवीन श्रेयांकन याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

 द्वितीय सत्रात डॉ. मनोहर सानप यांनी आऊटकम बेस्ड एज्युकेशन त्याचे महत्व व कार्यान्वित पद्धत आणि कोर्स आऊटकम सी.ओ, पी.ओ मॅपिंग याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रमुख वक्ते डॉ. एम. जी. मुल्ला यांनी मेजर-मायनर विषय निवड व त्याची एकूण श्रेयांकन पद्धत तसेच अभ्यासक्रमांत नव्याने समावेश करण्यात येणारे इंडियन नॉलेज सिस्टीम या विषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले,  उपाध्यक्ष (एच.आर.) डॉ. रोहित नवले, उपाध्यक्ष (एडमीन) रचना नवले-अष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. मकरंद वझल, प्राचार्य डॉ. मगन घाटुळे, प्राचार्य डॉ. विजय ढोले, प्राचार्य डॉ. नंदिनी देशपांडे, कॅम्पस डायरेक्टर डॉ. धनंजय मंडलिक, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी समन्वयक म्हणून प्रा.अविनाश पाटील, प्रा. शितल खरड, डॉ.अर्चना भिसे, प्रा.सारंग हातवळणे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सारिका मोहिते यांनी केले तर आभार समन्वयक प्रा. अविनाश पाटील यांनी मानले.