स्मार्ट उपकरणांसाठी एमआयटी विश्वशांती विद्यापीठास मिळाला नवा पेटंट
आयओटी वर आधारित या स्मार्ट उपकरणामुळे तेल कंपन्यांचे हजारो डॉलर्स वाचणार आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील (MIT University) प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना बनवलेल्या स्मार्ट इनलाईन इन्स्पेक्शन टूल (सिली) उपकरणांसाठी विद्यापीठाला पेटंट मिळाले (The university received a patent) आहे. आयओटी वर आधारित या स्मार्ट उपकरणामुळे (Smart device) तेल कंपन्यांचे हजारो डॉलर्स वाचणार आहेत.
या उपकरणासाठी पृथ्वीराज पाटील, स्लाविन मस्करेन्हास, विराज जिवाणे, अश्वजीत पवार, दीपक कुमार यादव आणि रिया हुद्दार ह्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विघ्नेश शेणॉय, संकेत शिंदे आणि स्नेहल कोळेकर या प्राध्यपकांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.
उपकरणाबद्दल सांगताना विद्यार्थी पृथ्वीराज पाटील म्हणला, "तेल पाइपलाइन मधून वाहत असताना त्यात अनेक वेळा मेणासारखा थर जमा होतात आणि त्यामुळे तेल प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो आणि कंपन्यांचे नुकसान होते. तसेच हा थर काढण्यासाठी यंत्रांचा वापर करण्यात येतो, त्या साठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. तसेच नक्की कोठे हा थर जमा झाला आहे हे समजत नसल्यामुळे संपूर्ण पाईपलाईन साफ करावी लागते. अंदाजे एका विशिष्ट लांबीच्या पाईप साठी जवळपास ५० हजार डॉलर्स एवढा खर्च येतो. ह्या प्रक्रियेमध्ये तेवढ्या कालावधीसाठी काही प्रक्रिया बंद ठेवाव्या लागतात. त्यामुळे अजूनच खर्च वाढतो.
या समस्येबाबत विद्यार्थ्यांना २०१९ मध्ये एका हॅकॅथॉन मध्ये सहभागी झाल्यावर समजले आणि त्या स्पर्ध्येत हे उपकरणावर काम करण्यास सुरु केली. सिली हे उपकरण पाईप मध्ये जमलेल्या मेणाच्या जाडीबद्दल रिअल-टाइम मध्ये माहिती प्रदान करते. यासाठी हे आयओटी आधारित यंत्र विविध सेन्सर्स वापरते."
"रियल टाइम मध्ये मिळालेल्या माहितीने, मेणासारखा थर जमा होण्याचा ट्रेंड समजतो तसेच किती दिवसानंतर किती थर वाढेल हे गणित करून खरंच पाईप साफ करायची गरज आहे का? हे सांगते. खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा थर जमा होतो. तेव्हाच साफ केल्यानंतर इतर वेळेस सफाई करण्याचा खर्च वाचतो, असे पृथ्वीराज पाटील म्हणाला.
या उपकरणांसाठी विद्यापीठाने २०२१ मध्ये अर्ज केला होतो. भारतीय पेटंट कार्यालयाने नुकताच त्या संबंधित पेटंट विद्यापीठाला दिले आहे. रिया हुद्दार ह्या बद्दल म्हणाली “प्रोजेक्ट स्टेटमेंट एका तेल कंपनीने दिले होते. आम्ही आमच्या परीने योगदान दिले. आम्ही सर्वांनी अभ्यास केला होता. या प्रक्रियेमध्ये आम्ही खूप काही शिकलो टीम वर्क, आपली कल्पना पटवून देणे, ती सत्यात आणण्यासाठी वेगवेगळ्या शाखेतील महत्वाच्या गोष्टी एकत्र आणून त्यावर काम करणे इत्यादी," असेही ती म्हणाली .