गिरीष महाजनांसोबत रणजितसिंह देओल, सुहास दिवसे निघाले जर्मनी अन् स्वित्झर्लंडला
राज्यात फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी राज्य शासन पावले उचलत आहे. याचाच एक भाग म्हणून या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजिसिंह देओल (Ranjit Singh Deol), उपसचिव सुनिल हंजे आणि क्रीडा आयुक्त सुहास दिवसे (Suhas Diwase) हे क्रीडा मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांच्यासोबता नऊ दिवसांच्या जर्मनी (Germany) आणि स्वित्झर्लंडच्या (Switzerland) दौऱयावर जाणार आहेत. तेथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा, प्रशिक्षण संस्थांची पाहणी त्याचप्रमाणे कीडाविषयक करारही केले जाणार आहेत.
राज्यात फुटबॉल (Football) खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी राज्य शासन पावले उचलत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने फुटबॉल क्लब बायर्न म्युनिच, जर्मनी या जगप्रसिध्द संस्थेसोबत फुटबॉल या खेळाच्या प्रशिक्षण व विकासाच्या अनुषंगाने सहकार्य करार केला आहे. त्यानुसार राज्यातील १४ वर्षाखालील २० खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व व्यवस्थापक यांना फुटबॉल खेळाच्या अद्ययावत प्रशिक्षणाकरीता जर्मनी येथे पाठविले जाणार आहेत.
मुलींची अंतर्वस्त्र तपासली; ‘नीट’दरम्यान धक्कादायक प्रकार, रुपाली चाकणकरांकडून चौकशीचे आदेश
फुटबॉल क्लब बायर्न म्युनिच, जर्मनी या संस्थेने तेथील उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, क्रीडा संकुल व्यवस्थापन, निवड अत्याधुनिक प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान वासंदर्भात पाहणी व अभ्यास करण्यासाठी क्रीडा मंत्री तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांना जर्मनी येथे आमंत्रित केले आहे.
त्याचप्रमाणे डॉ. क्लाऊडे स्ट्रीकर कार्यकारी संचालक, इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ स्पोर्टस सायन्स अॅन्ड टेक्नोलॉजी (AISTS), लॉसने, स्वित्झर्लंड यांनी योग व मल्लखांब केंद्र स्थापन करण्यासाठी तसेच राज्याच्या क्रीडा क्षेत्रास आधुनिक व आंतररराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण व क्रीडा शिक्षणाची जोड देण्यासाठी संस्थेस भेट देण्याची विनंती केली होती. यानुषंगाने गिरीष महाजन यांच्यासह देओल, दिवसे व हंजे हे दि.१८ ते २६ मे या कालावधीत जर्मनी व स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
परदेश दौऱा यासाठी आहे महत्वाचा -
१) आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडाक्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्मिती, व्यवस्थापन आणि देखभालीचे विविध पैलू
२) क्रीडासंकुलाचे व्यवस्थापन तसेच संकुलासंदर्भातील अन्य महत्वपुर्ण बाबी
३) युवा आणि तळागाळातील क्रीडा विकास धोरण, उच्च कार्यक्षमता केंद्रांची रणनीती आणि प्रक्रिया
४) क्रीडा रणनीतीमध्ये क्रीडा विज्ञान आणि क्रीडा औषधे यांचा समावेश
५) क्लब, खेळाडू आणि शासनाव्दारे स्पोर्टस् टेक्नॉलॉजीचा घेण्यात येणारा लाभ तसेच त्यास दिले जाणारे पाठबळ.
६) क्रीडा उपकरणांव्दारे गुणात्मक तसेच सूक्ष्मस्तरापासून विश्लेषण
७) अत्याधुनिक प्रशिक्षण पध्दती, कपॅसीटी बिल्डिंग प्रक्रिया व खेळाडूंची निवड पध्दती
८) मल्लखांब व योगा सेंटरची उभारणी आणि प्रचार व प्रसार