हे जरा जास्तच झालंय! विद्यापीठ कायद्यात बदल करून राज्यपालांना कारवाईचे अधिकार देणार

मंत्री पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना २०१७ मध्ये आलेल्या विद्यापीठ कायद्यांमुळे विद्यापीठांना खूप स्वायत्तता मिळाल्याचे सांगितले.

हे जरा जास्तच झालंय! विद्यापीठ कायद्यात बदल करून राज्यपालांना कारवाईचे अधिकार देणार
Minister Chandrakant Patil

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात (Universities in Maharashtra) मागील काही दिवसांत काही प्रकरणांसह राज्य शासनासह (Maharashtra Government) राज्यपालांनीही (Governor) थेट कारवाई करता आली नव्हती. या मुद्द्यावर विधानसभेत (Assembly) झालेल्या चर्चेदरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांनी हे जरा जास्तच झाल्याचे सांगत कायद्यात बदल करणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार राज्यपालांना कारवाईचे अधिकार मिळणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये एका चौकशीदरम्यान राज्यपालांनाही कारवाई करता आली नव्हती. याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार नितीन राऊत यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंत्री पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना २०१७ मध्ये आलेल्या विद्यापीठ कायद्यांमुळे विद्यापीठांना खूप स्वायत्तता मिळाल्याचे सांगितले.

NCC च्या विद्यार्थ्यांना ट्रेनरकडून अमानुष मारहाण; सोशल मीडियात ठाण्यातील व्हिडीओ व्हायरल

पाटील म्हणाले, २०१७ साली आपण स्वीकारलेल्या विद्यापीठ कायद्याने विद्यापीठे खूप स्वायत्त करून टाकली आहेत. सरकारला तसेच राज्यपालांनाही हस्तक्षेप करायला कुठलाही वाव नाही. मागील काही दिवसांत नागपूर आणि सोलापूर विद्यापीठ ही दोन मोठी उदाहरणे झाली आहेत. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या चौकशीसाठी चौकशी आयोग नेमला होता. कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या उच्च न्यायालयात गेल्या.

न्यायालयाने आपली कारवाई तर थांबविली आणि सरकारलाही खूप फटकारले आणि तुम्हाला काही अधिकार नसल्याचे सांगितले. त्यावर आता आपण राज्यपालांना सांगून एक स्टॅट्युटरी बदल करणार आहोत. त्यानुसार अशा प्रकरणांमध्ये राज्यपाल कारवाई करू शकतात, हा बदल आणतोय. तो बदल येत्या दोन दिवसांत करू. त्यानुसार आपल्याकडे रिपोर्ट आल्यानंतर तो राज्यपालांना सोपवायचा. आधी राज्यपालांनाही अधिकारी नव्हते. विद्यापीठ नीट चालावे, हा त्यामागचा चांगलाच हेतू होता. पण हे जरा जास्तच झालंय, असे पाटील यांनी सांगितले.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘आयआयटी’मध्ये शिकण्याची संधी

इराकमधील विद्यार्थ्यांनी नागपूरचं का निवडले?

इराकमधील २७ विद्यार्थ्यांनी नागपूर विद्यापीठाची बोगस पदवी प्रमाणपत्र मिळवल्याचा प्रकार समोर आला होता. या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा झाली. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगितले. बोगस पदवी विषयामध्ये नागपूर विद्यापीठाची काहीच भूमिका आहे. इराक दुतावासाने हे मान्य करून तिथे आता त्या विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली आहे, असे पाटील यांनी सांगितले. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी इराकच्या विद्यार्थ्यांनी नागपूर विद्यापीठ का निवडले, काहींचे हितसंबंध आहेत, असे सवाल केले. त्यावर पाटील यांनी आपल्यालाही असा प्रश्न पडल्याचे सांगत त्याच्या खोलात जाणार असल्याचे सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD