AIAPGET 2024: आयुष परीक्षेची सिटी स्लिप प्रसिद्ध

परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार exams.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटद्वारे परीक्षा सिटी स्लिप डाऊनलोड करू शकतात.

AIAPGET 2024: आयुष परीक्षेची सिटी स्लिप प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा (AIAPGET) 2024 साठी 1 जुलै रोजी परीक्षा सिटी स्लिप (City slip) जारी करण्यात आली आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार  exams.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटद्वारे परीक्षा सिटी स्लिप डाऊनलोड करू शकतात. AIAPGET परीक्षा 6 जुलै 2024 रोजी घेतली जाणार आहे. तर प्रवेशपत्र (Halltickets) 2 जुलै रोजी जारी करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

AIAPGET परीक्षेचा कालावधी 2 तासांचा असणार आहे. यामध्ये 120 प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न 4 गुणांचा असेल. उमेदवारांना प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एकूण गुणांमधून 1 गुण वजा केला जाणार आहे.

सिटी स्लिप कशी डाउनलोड करावी?

उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाईट- Exams.nta.ac.in/AIAPGET ला भेट द्या. मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एंट्रन्स टेस्ट (AIAPGET)-2024 च्या अर्जदारांना वाटप केलेल्या परीक्षेच्या शहराची आगाऊ माहिती शीर्षकाच्या लिंकवर क्लिक करा. लॉगिन पृष्ठावर, अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट करा. त्यानंतर AIAPGET 2024 परीक्षा सिटी स्लिप स्क्रीनवर प्रदर्शित होईल. ते डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंटआउट घ्या.