NEET पेपर लीक करण्यासाठी 30 कर्मचार्‍यांची टोळी 

मुख्य सूत्रधार संजीव मुखिया पेपर लीक करण्यासाठी 30 जणांना कामावर ठेवले होते. त्यांना वेळेवर पगार द्यायचा आणि अनेकांना बाईकही दिल्या होत्या.

NEET पेपर लीक करण्यासाठी 30 कर्मचार्‍यांची टोळी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET पेपर लीक (NEET Paper Leak)प्रकरणात सातत्याने मोठ मोठे खुलासे होत आहेत. CBI चौकशीत (CBI investigation)या प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. CBI चौकशीत समोर आले आहे की, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संजीव मुखियाने (Sanjeev Mukhiya)पेपर लीक करण्यासाठी 30 जणांना कामावर ठेवले होते, त्यांना वेळेवर पगार द्यायचा आणि अनेकांना बाईकही दिल्या होत्या.

NEET पेपर लीक प्रकरणी सीबीआयने पाटणा येथे केलेल्या अटकेमुळे अनेक खुलासे झाले आहेत. पेपर लीक किंगपिन संजीव मुखियाबाबत इतर आरोपींची चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये संजीव मुखियाच्या काळ्या साम्राज्याबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपी संजीव हा पेपरफुटीचे संपूर्ण नेटवर्क एका फर्मप्रमाणे चालवत होता. पेपरफुटीची संपूर्ण टोळी संजीव मुखिया यांच्या सूचनेनुसार काम करत असल्याचे चौकशीत उघड झाले.

पोलीस संजीवचा शोध घेत आहेत. बिहार पोलीस NEET पेपर लीक प्रकरणी संजीव कुमार उर्फ संजीव मुखिया उर्फ लुटनचा शोध घेत आहेत. संजीव मुखिया नालंदा येथूनच पेपर लीक टोळी चालवायचा.

आरोपींनी सांगितले की, "संजीव देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू शकतो. तो नेपाळलाही वारंवार भेट देतो. संजीव मुखिया उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात आणि इतर अनेक राज्यांमध्ये संपर्क ठेवायचा. सीबीआयचे पथक सध्या 6 राज्यांमध्ये संजीव मुखियाचा शोध घेत आहेत.