कला - कौशल्य जोपासत विद्यार्थ्यांनी छंदातून करिअर घडवावे ; खा. मेधा कुलकर्णी 

समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले शिक्षण देण्याचे कार्य सरस्वती मंदिर संस्था करत आहे. तसेच समाजाचे ऋण ही संस्था फेडते आहे, अशी भावना डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 

कला - कौशल्य जोपासत विद्यार्थ्यांनी छंदातून करिअर घडवावे ; खा. मेधा कुलकर्णी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आजचा विद्यार्थी जीवनावश्यक कौशल्य प्राप्त करीत आहे. मात्र , विद्यार्थ्यांनी विविध कला , कौशल्य जोपासत छंदातून करिअर घडवावे (Students should make a career out of hobby by cultivating arts and skills), असा मोलाचा कानमंत्र राज्यसभा खासदार डॉ . मेधा कुलकर्णी (Dr. Medha Kulkarni) यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच प्रत्येकाला काम मिळावे आणि स्वयंरोजगार मिळावा याचा नवीन शैक्षणिक धोरणात विचार झाला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची (New Education Policy) उद्दिष्टे स्किल डेव्हलपमेंट कोर्समुळे शक्य होईल. समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले शिक्षण देण्याचे कार्य सरस्वती मंदिर संस्था करत आहे, समाजाचे ऋण ही संस्था फेडते आहे, असेही मेधा कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

सरस्वती मंदिर संस्थेच्या सरस्वती मंदिर सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट सेंटर, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, नांदी फाउंडेशन आणि सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पारितोषिक व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. मेधा कुलकर्णी बोलत होत्या. कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्या बागेश्री मंठाळकर , सरस्वती मंदिर संस्थेचे चेअरमन प्रा. विनायक आंबेकर आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात कौशल्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. मेधा कुलकर्णी व बागेश्री मंठाळकर यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

विनायक आंबेकर  म्हणाले, सरस्वती मंदिर या शिक्षण संस्थेला १२० वर्षापासून जूना इतिहास असून संस्था विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबरच जीवन कौशल्य आत्मसात करण्याचे प्रशिक्षण देखील देते, तसेच विविध प्रकारचे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस चालविले जातात. यापुढे विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार कसा करता येईल यादृष्टीने देखील प्रयत्न केले जाणार आहेत. 

अतिशय सामान्य परिस्थितीतून आलेल्या विद्यार्थ्याला तांत्रिक कला व कौशल्य आत्मसात करून देण्याचे काम सरस्वती मंदिर संस्था करते आहे. तसेच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड  सारख्या संस्था सामाजिक कार्यात मोलाचे कार्य करीत आहे, असे बागेश्री मंठाळकर यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमास सुनील तगरे, ऋतुजा पायगुडे, अविनाशजी नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील शेटे आदी उपस्थित होते.