MPSC टायपिंग स्किल टेस्ट तांत्रिक कारणामुळे रद्द; TCS कंपनीचा भोंगळ कारभार

एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी जबादारी स्वीकारून राजीनामे द्यावेत, अशी मागणी पुणे शहर व जिल्हा इंटकचे जिल्हाध्यक्ष बळीराम डोळे यांनी केली आहे.

MPSC टायपिंग स्किल टेस्ट तांत्रिक कारणामुळे रद्द; TCS कंपनीचा भोंगळ कारभार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC)मुंबई येथे टायपिंग स्किल टेस्ट (Typing Skill Test)घेतली जाणार होती त्यासाठी राज्यभरातून उमेदवार मुंबईत दाखल झाले होते. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळे सोमवारी व मंगळवारी (दि.1 व 2 जुलै ) होणारी टायपिंग स्किल टेस्ट रद्द (Typing skill test cancelled)करण्यात आली आहे. पुढील चाचणी 1 ऑगस्टनंतर घेण्यात येईल, असे सांगितले जात आहे.त्यामुळे उमेदवारांकडून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत, (MPSC officials should resign) अशी मागणी पुणे शहर व जिल्हा इंटकचे जिल्हाध्यक्ष बळीराम डोळे (District President of District Intak, Baliram Dole)यांनी केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सकाळी टायपिंग स्किल टेस्ट घेतली जाणार होती. परंतु, सकाळच्या सत्रातील विद्यार्थी साडेअकरा वाजेपर्यंत बाहेर न पडल्याने दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने टायपिंग स्किल टेस्ट घेता येत नसल्याची माहिती समोर आली. त्यावर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सोमवारी व मंगळवारी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून या परीक्षेची तारीख लवकरच प्रसिद्ध केली जाईल, असे सांगितले. त्यामुळे उपस्थित उमेदवारांनी एकच गोंधळ घातला.

बळीराम डोळे म्हणाले, पावसाळा सुरू असताना विद्यार्थी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुंबईसारख्या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी येतात. त्यांचा प्रवास खर्च व मुंबईत राहण्याचा खर्च हा सुमारे पाच हजाराच्या घरात जातो. या विद्यार्थ्यांचा आर्थिक खर्च कोण भरून देणार ? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पारदर्शकपणे परीक्षा घेण्याची जबाबदारी आहे मात्र तांत्रिक अडचणीच्या कारणाने ही परीक्षा ची जबाबदारी टीसीएस कंपनीच्या माती मारले जात आहे जर प्रत्येक परीक्षा घेण्यात टीसीएस अपयशी ठरत असेल तर टीसीएस कंपनीचे कंत्राट तात्यांनी रद्द करावे तसेच परीक्षा घेण्यात अपयशी ठरलेल्या सचिवांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा.

 एमपीएससीतर्फे आयोगातर्फे याबाबतचे परिपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे : https://x.com/mpsc_office