CBSE Result : दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

सीबीएसईने फेब्रुवारी-मार्च मध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल १२ मे रोजी १० वी व १२ वीचा निकाल जाहीर केला होता.

CBSE Result : दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
CBSE 10th Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शुक्रवारी दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. CBSE ने त्यांच्या अधिकृत पोर्टल results.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in वर निकाल जाहीर केला आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक, शाळा क्रमांक, जन्मतारीख, प्रवेशपत्र क्रमांक आवश्यक आहे, अशी सूचना CBSE कडू देण्यात आली आहे. (CBSE Result)

सीबीएसईने १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी १७ ते २२ जुलै दरम्यान पुरवणी परीक्षा घेतली होती. सीबीएसईने फेब्रुवारी-मार्च मध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल १२ मे रोजी १० वी व १२ वीचा निकाल जाहीर केला होता. दोन्ही वर्गांचे निकाल एकाच दिवशी जाहीर झाले. त्यानंतर पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली. ही परीक्षा जुलैमध्ये परीक्षा घेण्यात आली होती.

PMC Schools : आमदार माधुरी मिसाळ यांनी शाळांच्या दुरावस्थेचे विधानसभेत काढले वाभाडे

CBSE च्या १० वी परीक्षेसाठी जवळपास २१.८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २१ लाख ६५ हजार ८०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दरम्यान CBSE ने नुकताच १२ वी च्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

असा पहा निकाल

* सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट-cbseresults.nic.in वर हेत द्यावी

* त्यानंतर, प्रदर्शित मुख्यपृष्ठावर, 'दहावी प्रमाणपत्र परीक्षा (पूरक) निकाल २०२३' असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.

* आता एक नवीन लॉगिन पृष्ठ उघडेल. आता तुमचा रोल नंबर, शाळा क्रमांक आणि अॅडमिट कार्ड आयडी टाका आणि सबमिट करा.

* त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर निकाल दिसेल. आता ते तपासा आणि नंतर त्याची प्रिंटआउट घ्या.

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD