UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर

परीक्षेत बसलेले उमेदवार upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात.

UPSC  प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC)  नागरी सेवा (प्रिलिम्स) परीक्षा 2024 चा निकाल (result) जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात. UPSC CSE प्रिलिम्स परीक्षा 16 जून 2024 रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा 20 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. प्री परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार UPSC CSE Mains 2024 साठी पात्र असणार आहेत.

नागरी सेवा प्रिलिम्स परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार पुढील आणि महत्त्वाच्या टप्प्यावर जातील, UPSC CSE मुख्य परीक्षा 2024 आणि शेवटी मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी फेरी असे पुढचे टप्पे असणार आहे.

नागरी सेवा (प्रिलिम्स) परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह प्रकाराचे दोन पेपर होते (Multiple choice questions) आणि जास्तीत जास्त 400 गुण होते. यूपीएससीने यापूर्वी स्पष्ट केले होते की, प्रिलिम्स परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-2 मधील किमान 33% पात्रता गुण आणि सामान्य अध्ययन पेपर-1 मधील एकूण पात्रता गुणांच्या निकषांवर आधारित सिव्हिल सर्व्हिसेस  परीक्षेसाठी उमेदवार निवडले जातील.

असा करा निकाल डाउनलोड

UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या. मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या UPSC नागरी सेवा (प्राथमिक) निकाल 2024 लिंकवर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे उमेदवारांना आवश्यक तपशील प्रविष्ट करावे लागतील. सबमिट वर क्लिक करा आणि निकाल प्रदर्शित होईल. निकाल तपासा आणि डाउनलोड करा. पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.