SPPU News : विद्यापीठाकडून नव्या कुलसचिवांच्या शोधाला सुरूवात

विद्यापीठाच्या कुलसचिव पदी पाच वर्षे नियुक्ती केली जाते. प्रफुल्ल पवार यांच्या नियुक्तीस पाच वर्षे पूर्ण होत असून येत्या १२ नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यकाल संपणार आहे.

SPPU News : विद्यापीठाकडून नव्या कुलसचिवांच्या शोधाला सुरूवात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (SPPU) कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार (Registrar Dr. Prafulla Pawar) यांचा कार्यकाल येत्या नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने नव्या कुलसचिवांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. शासनाकडे (Maharashtra Government) त्यासंदर्भातील मंजूरीचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु,नव्या कुलसचिवांच्या नियुक्तीस डिसेंबर किंवा जानेवारी महिना उजाडणार आहे.

 

विद्यापीठाच्या कुलसचिव पदी पाच वर्षे नियुक्ती केली जाते. प्रफुल्ल पवार यांच्या नियुक्तीस पाच वर्षे पूर्ण होत असून येत्या १२ नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने कुलसचिव पदाची जाहिरात प्रसिध्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू होणार

 

उच्च शिक्षण विभागाकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव मंजूरीसाठी पाठवण्यात आला आहे. परंतु, अद्याप त्यास मंजूरी मिळाली नाही. परिणामी, प्रफुल्ल पवार यांच्या कार्यकाल समाप्तीपूर्वी नव्या कुलसचिवांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे काही महीने विद्यापीठाला प्रभारी कुलसचिव नियुक्त करावे लागणार आहेत.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा डोलारा मोठा आहे. त्यामुळे या पदी अनुभवी आणि सक्षम व्यक्तीची नियुक्ती होणे अपेक्षित आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा व्यक्ती कुलसचिव म्हणून विद्यापीठाला मिळावा, अशी अपेक्षा विविध संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन पूर्णवेळ कुलसचिव मिळण्यास नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k