NCET 2024 परीक्षेची तारीख जाहीर; वाचा सविस्तर...

NTA ने दिलेल्या अधिसूचनेनुसार, NCET 2024 परीक्षा 10 जुलै 2024 रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

NCET 2024 परीक्षेची तारीख जाहीर; वाचा सविस्तर...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल कॉमन एंट्रन्स टेस्ट (NCET 2024) साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) या परीक्षेची तारीख (Exam Date) जाहीर केली आहे. NTA ने दिलेल्या अधिसूचनेनुसार, NCET 2024 परीक्षा 10 जुलै 2024 रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाणार आहे.

तसेच सदर परीक्षा मराठी, आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, पंजाबी, उडिया, तमिळ, तेलगू, उर्दू अशा एकूण १३ भाषांमध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षेला बसण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांसाठी, प्रवेशपत्रे परीक्षेच्या तीन दिवस आधी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जातील. यानंतर, उमेदवार अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि दिलेला सुरक्षा पिन टाकून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. 

प्रवेशपत्र जारी करण्यापूर्वी उमेदवारांना परीक्षेची सिटी स्लिप दिली जाईल. ते डाऊनलोड करून उमेदवारांना त्यांच्या परीक्षा शहराची माहिती मिळू शकेल आणि त्यानुसार त्यांच्या तयारी करता येईल. या प्रवेश परीक्षेद्वारे, आयआयटी (IIT), एनआयटीसह (NIT) देशभरातील केंद्रीय/राज्य विद्यापीठे/संस्था, आरआयई आणि सरकारी महाविद्यालयांमध्ये 4 वर्षांच्या एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमात (ITEP) प्रवेश दिला जाईल. 

दरम्यान, कोणत्याही प्रकारची मदत किंवा माहिती मिळविण्यासाठी उमेदवार 011-40759000 वर कॉल करून किंवा ncet@nta.ac.in वर संपर्क साधू शकतात.