डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्य कुशल प्रशासक आणि सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ : डॉ.नरेंद्र जाधव यांचे प्रतिपादन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ' महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुआयामी प्रतिभावंत' या व्याख्याना दरम्यान डॉ.नरेंद्र जाधव बोलत होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्य कुशल प्रशासक आणि सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ : डॉ.नरेंद्र जाधव यांचे प्रतिपादन

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar हे केवळ पुस्तकी अर्थतज्ज्ञ नव्हते तर ते कार्य कुशल प्रशासक आणि भारतातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ होते. देशात एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना, कामगारांच्या कामाचे तास १२ वरून ८ तास करणे आणि महिला कर्मचाऱ्यांना प्रसुतीपूर्व रजा देणे हे सर्व त्यांच्या प्रयत्नातून झालेले बदल आहेत, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, भारताच्या नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि पुणे विद्यापीठाचे Pune University माजी कुलगुरू डॉ.नरेंद्र जाधव Dr. Narendra Jadhav यांनी व्यक्त केले.

        सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ' महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुआयामी प्रतिभावंत' या व्याख्याना दरम्यान डॉ.नरेंद्र जाधव बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ.मनोहर जाधव, अण्णाभाऊ साठे अध्यासन प्रमुख डॉ.सुनील भंडगे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, डॉ.नितीन घोरपडे, अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, डॉ.विजय खरे, वसुंधरा जाधव,  आदी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ घटनेचे शिल्पकार नाही तर ते उत्कृष्ट विद्यार्थी, अर्थतज्ज्ञ, अर्थ प्रशासक, कायदेतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, राजकीय मुसद्दी, भाषावाद प्रांतरचनेचे शिल्पकार, बौद्ध धर्म चक्र प्रवर्तक असे बहुआयामी प्रतिभावंत होते. महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधाबाबत बोलताना ते म्हणाले, काही विषयात या दोघांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी देशाच्या हिताबाबत त्यांनी कायम एकत्र काम केले.