युनायटेड स्टेट्स इंडिया फाउंडेशनकडून विद्यार्थी शिक्षकांना फेलोशिप
यासाठी उत्कृष्ट भारतीय विद्यार्थी, विद्वान, शिक्षक, कलाकार आणि विविध पार्श्वभूमीतील व्यावसायिकांना या फेलोशिपसाठी अर्ज करता येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
युनायटेड स्टेट्स इंडिया एज्युकेशनल फाउंडेशन (USIEF) ने नेहरू आणि इतर फुलब्राइट फेलोशिप्ससाठी (Fulbright Fellowships) वार्षिक स्पर्धा सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारतातील यूएस दूतावासाने (US Embassy in India) अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "उत्कृष्ट भारतीय विद्यार्थी, विद्वान, शिक्षक, कलाकार आणि विविध पार्श्वभूमीतील व्यावसायिकांना या फेलोशिपसाठी अर्ज करता येणार आहे."
अधिकृत निवेदनानुसार, यूएस स्टेट डिपार्टमेंट आणि भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या फेलिशिप साठी निधी दिला आहे. शैक्षणिक, संशोधन, अध्यापन आणि व्यावसायिक क्षमता समृद्ध करणाऱ्या उपक्रमांमुळे भारत आणि युनायटेड स्टेट्सला जवळ येण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
USIEF आता शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी भारतीय नागरिकांकडून अर्ज स्वीकारत आहे. संपूर्ण माहिती आणि तपशीलासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.usief.org.in ला भेट देऊ शकतात.
अर्जदार त्यांच्या शंका ip@usief.org.in वर पाठवू शकतात. या व्यतिरिक्त नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता किंवा मुंबई येथील USIEF कार्यालयांशी संपर्क साधू शकतात.