PNB अप्रेंटिस भरती 2024 : 2700 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

अर्ज 30 जून पासून सुरू झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलैपर्यंत आहे.

PNB अप्रेंटिस भरती 2024 : 2700 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदांच्या एकूण 2 हजार 700 रिक्त जागा (2700 vacancies) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 30 जून पासून सुरू झाले असून येत्या 14 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. पदवी पूर्ण केलेल्या आणि 20 ते 28 वर्षे वयोगटातील बँकिंग इच्छुकांसाठी ही सर्वोत्तम संधी आहे. 

पंजाब नॅशनल बँकेत शिकाऊ कायदा 1961 अंतर्गत शिकाऊ पदांच्या भरतीसाठी PNB शिकाऊ अधिसूचना अधिकृत वेबसाइट www.pnbindia.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी त्यांची पात्रता आणि भरती मोहिमेसंबंधी इतर तपशीलांची खात्री करण्यासाठी जाहिराती तपासावी.

पंजाब नॅशनल बँक (PNB) प्रशिक्षणार्थी पदांसाठी 2 हजार 700 रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेची तीन टप्प्यात निवड प्रक्रिया होणार आहे. ऑनलाइन परीक्षा, स्थानिक भाषेची चाचणी आणि वैद्यकीय परीक्षा. प्रशिक्षणाचा एकूण कालावधी कराराच्या तारखेपासून एक वर्षाचा असेल. नोंदणी वेळापत्रक, परीक्षेची तारीख आणि इतर तपशीलांसह PNB शिकाऊ अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्जाची लिंक 14 जुलै 2024 पर्यंत सक्रिय राहील.